Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कुठं मुसळधार, तर कुठं सर्वदूर रिमझिम

आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल.

Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कुठं मुसळधार, तर कुठं सर्वदूर रिमझिम
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 9:09 AM

मुंबई : आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्या टप्प्याने याचा प्रभाव असेल.

दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार व अतिमूसळधार पाऊस असेल. त्याचा सर्वात जास्त प्रभाव नार्थ कोकणात असेल. ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे. वर्तवली आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाला सुरुवात झालीय. मध्यरात्रीपासूनच या पावसाला सुरुवात झाली. रिमझिम झाडीच्या पावसामुळे खरिपाच्या पिकाला जीवदान मिळालंय. झड पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन मात्र विस्कळीत झालेय.

गोंदिया

गोंदिया जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय. यामुळे बळीराजा सुखावलाय. गोंदिया जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. शहरासह ग्रामीण परिसरात पावसाची गेल्या 4 दिवसांपासून दररोज एक दोन तास जोरदार बॅटिंग सुरू आहे. काही तालुक्यांमध्ये संततधार पाऊस येत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. शहर परिसरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नांदेड

नांदेडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. विष्णुपुरी बंधाऱ्याचे 9 दरवाजे उघडले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास निर्माण होणारी पूरसदृश्य स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

अकोला

अकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्ध्या तासापासून अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

वाशिम

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे वाशिम जिल्ह्यात 6 सप्टेंबरला रात्री विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. या अतिपावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या उडीद, मूग पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात वाढ होणार असल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

रत्नागिरी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. खेड चिपळूण दापोली या भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दापोली शहरातील केळस्कर नाका येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. चिपळूणमधील बाजारपूल पाण्याखाली गेलाय. दरम्यान, जिल्ह्यामध्ये पुढील 24 तास मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नागरिकांना सूचना दिल्यात.

हवामान खात्याकडून 3-4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात कुठं कुठं पावसाचा अंदाज?

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर परिणाम होत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे. मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस

इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहर व तालुक्यात रिमझिम अशा पावसाच्या सरी होत होत्या. मात्र शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत होता. शहर व तालुक्यात ढगाळ वातावरण होते. यानंतर इंदापूर तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

यवतमाळमध्ये गारपीट

यवतमाळ शहरासह नेर तसेच पुसद परिसरात सोमवारी (6 सप्टेंबर) पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसला. यवतमाळसह नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात पावसा दरम्यान गारपीट झाली. पावसाळ्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे बैल पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

हेही वाचा :

Ratnagiri Rain | दापोलीच्या इतिहासातील थैमान घालणारा पाऊस, चिपळूणमध्येही 16 तासापासून मुसळधार, सतर्कतेचा इशारा

चिपळूणमध्ये भरतीच्या वेळी शहरात पुन्हा पाणी भरण्याची शक्यता, नगरपालिकेकडून मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर

मुंबईसह राज्यभर पावसाचा जोर वाढणार; विजांच्या कडकडाटासह हजेरी लागणार

व्हिडीओ पाहा :

Maharashtra Rain Live Updates 7 September 2021 Mumbai Aurangabad Ratnagiri Washim Gondia

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.