Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेनं राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे

Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार
पाच जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:29 AM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेनं राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आजची स्थिती काय? कोणत्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आजच्यासाठी रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

22 जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

23जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचं जोरदार पुनरागमन

मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मिठी नदी दुथडी भरुन वाहत आहे. समुद्राला आज भरती असल्यानं प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. मुंबईतील 24 वार्ड मध्ये प्रशासन दक्षझालं आहे. समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. किंग्ज सर्कल परिसरातही पाणी असल्याचं समोर आलं आहे. काल उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा कमबॅक केलं आहे.

नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू

सकाळ पासून रिमझिम सुरू होणाऱ्या पाऊस आता जोर धरला आहे ,नेरुळ,बेलापूर,वाशी,ऐरोली परिसरात पावसात सुरुवात झाली आहे.

इतर बातम्या:

मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

Mumbai Rains Live Update | मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update IMD issue Red Alert for Raigad Ratnagiri Pune Satara Kolhapur predicted heavy rainfall

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.