मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
IMD has issued district level Heavy rainfall at isolated places warnings for period 29 Jul to 2 Aug 2021 for Maharashtra. 5th day there is no warning.
for further details pl visit @RMC_Mumbai and @RMC_Nagpur websites of IMD pic.twitter.com/Byp8PUJqZB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 29, 2021
हवामान विभाग पावसाच्या स्थिती संदर्भात अॅलर्ट जारी करते. आजच्या दिवसासाठी हवामान विभागनं ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 जुलै रोजी राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. 1 ऑगस्टला केवळ रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावासाचा अॅलर्ट देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे मावळ तालुक्यातील भात शेतकरी चिंतेत आहे. पंधरा हजार हेक्टर पैकी अडीचशे हेक्टर क्षेत्र वाहून गेलंय.तर एकूण अकराशे हेक्टर पिकाचे नुकसान झालंय. आजपर्यंत जुलै महिन्यात इतका कधी पाऊस झालाच नव्हता असं इथले शेतकरी सांगतात. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला 500 मिलिमीटर पाऊस झाला होता, यंदा तर 1700 मिलिमीटरची नोंद झाली. म्हणजे तिप्पट पाऊस कोसळल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
पाटण ढेबेवाडी विभागातील येथील डावरी चोपडेवाडी गावच्या खाली असणारा डोंगर पाऊसाने खचु लागला आहे. यामुळे 65 घरांना धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीच्या काळात अनेक एकर जमिन वाहून गेली आहे. नागरिकांनी मिळेल तेथे आसरा घेतला असून शासनाने नागरिकांना संसारोपयोगी साहित्य व आश्रय देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्या गावामध्ये शासकीय यंत्रणा येथे पोहचलीच नसल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Rain Update IMD issue yellow alert for districts of kokan and Western Maharashtra