Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाडा, विदर्भात पावसाची बॅटिंग

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या एक ते दोन दिवसात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाडा, विदर्भात पावसाची बॅटिंग
Aurangabad rain
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 3:39 PM

मुंबई: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या एक ते दोन दिवसात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागानं औरंगाबाद, जालना, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांना आजच्या दिवसासाठी ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केलाय. तर, बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आलाय.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाचं कमबॅक

भारतीय हवामान विभागानं काल जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे.

या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जळगाव, अहमदगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, बुलडाणा,वाशिम, जालना, बीड, अहदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 18 ऑगस्टसाठी यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी

नांदेड जिल्ह्यात आज सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावलीय. सुकत चाललेल्या खरीप हंगामातील पिकांना त्यामुळे जीवदान मिळालंय. गेल्या वीस दिवसापासून खंड दिल्यानंतर वरुणराजाच्या आजच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. दरम्यान, यंदा प्रथमच श्रावण महिन्यातील एक आठवडा कोरडा गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली होती, त्यातच उकाडा वाढल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने हजेरी लावल्याने चैतन्य पसरलय.

अकोल्यात 12 दिवसानंतर जोरदार पावसाची हजेरी

अकोल्यात 12 दिवसानंतर जोरदार पावसाची हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून आज जोरदार पाऊस झाला. या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे.

नागपूरमध्ये जोरदार पाऊस

नागपुरात जवळपास 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जोरदार पावसाचं आगमन झालं. भर दुपारी आलेल्या पावसाने शहरवासियांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, शेतकऱ्यांनाच्या दृष्टीने हा पाऊस संजीवनी ठरणार आहे. शहरात सुद्धा काही दिवसांपासून चांगलाच उकाडा वाढला होता त्या पासून सुद्धा दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाट सह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. विदर्भाच्या काही जिल्ह्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली.

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यासह अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात गेल्या 25 दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर पावसाचे दमदार आगमन झाले. सोमवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झाले. या पावसामुळे खरीप पिकाला चांगलाच फायदा होणार आहे. 25 दिवस पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले होते. परंतु काल पडलेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे.

अमरावतीमध्येही मुसळधार

गेल्या महीनाभरापासून पावसाने दडी मारल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. शेतकऱ्यांनी कृत्रिम सिंचन व्यवस्था करून शेतातील पिके जगविली होती. हवामान खात्याने 15 ऑगस्टला पावसाचा अंदाज वर्तविलेला होता. आज सकाळ पासून अमरावतीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस आल्याने शेतातील पिकांना आता संजीवनी मिळणार आहे. तर विदर्भातील प्रकल्पात जलसाठा देखील वाढणार आहे. हवामान खात्याने पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकरी सुखावला आहे.

यवतमाळमध्ये रिपरिप

यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते.पिकांचं नुकसान होत होते. आज 15 दिवसाच्या उसंती नंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 15 दिवस पाऊस न झल्याने शेतात भेगा पडत होत्या त्यामुळे आज दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने 3 दिवस पाऊस विदर्भात सांगितले आहे तो अनुमान खरा ठरत पावसाची रिपरिप सुरू झाली. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले होते. यंदाच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. पावसामुळे शेत शिवारात कामाला वेग येणार आहे.

चंद्रपूरमध्ये 20 दिवसानंतर पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 20 दिवसांनी पाऊस परतला.रात्री पावसाची मुसळधार हजेरी बघायला मिळाली. पहाटे पावसाने विश्रांती घेतल्यावर सकाळी पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. आकाश ढगाळलेले असल्याने पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 62टक्के पाऊस नोंदला गेलाय. दरम्यान चिमूर तालुक्यातील जांभुळघाट परिसरातील कोटगाव नाल्याला पूर आलाय.

इतर बातम्या:

पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरु, आर्थिक फटका बसण्याची भीती

Weather Update: मान्सून सक्रिय होतोय; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update IMD Predicts heavy rainfall in Marathwada and North Maharashtra for next one or two days

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.