Marathi News Live Update : पश्चिम रेल्वे चार तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; लोअर परळ पुलाचा गर्डर उभारणार
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
आज दिनांक 15 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महराष्ट्रात ऐवजी आता गुजरातमध्ये होणार आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आरोप- प्रत्यारोपाचं राजाकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान आता यामध्ये संभाजी ब्रिगेडनं देखील उडी घेतली आहे. राज्यातील लाखो लोकांना रोजगार देणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आज संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.