Maharashtra Supplementary Result 2023 : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा ‘या’ लिंकवर!

Maharashtra SSC / HSC supplementary result 2023 | दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या किंवा ज्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करायची असेल त्यांच्यासाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

Maharashtra Supplementary Result 2023 : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा 'या' लिंकवर!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 4:55 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचा पुरवणी निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra Supplementary Result 2023) दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या किंवा ज्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करायची असेल त्यांच्यासाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. जुलै-ऑगस्ट महिन्यात ही पुरवणी परीक्षा झाली होती, आता या परीक्षेचा निकाला जाहीर झाला आहे.

10वी, 12वी महाराष्ट्र पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात तसेच एकूण सरासरी 35 टक्के मिळणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या पुरवणी पेपरला 70 हजार 205 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 68 हजार 909 विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 144 विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये सायन्समधील 14 हजार 632, आर्ट्समधील 4 हजार 146 आणि कॉमर्समधील 3 हजार 28, व्यावसायिक अभ्यासक्रमातील 286 आणि आयटीआयच्या 52 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पुरवणी परीक्षेसाठी दहावीच्या 49 हजार 377 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील 45 हजार 166 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधील 13 हजार 487 विद्यार्थी पास झाले आहेत. यंदाच्या दहावीच्या निकालामध्ये घट झालेली दिसून आली आहे.

 खाली दिलेल्या वेब साईटवर पाहा निकालल -:

https://mahresult.nic.in/

या लिंकवर गेल्यावर तुमचा रोल नंबर आणि जन्म तारीख टाका. त्यानंतर हे सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा निकाल मिळून जाईल. दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या मोबाईलवरून MH परीक्षेचे नाव आणि रोल नंबर टाईप करा. हा मेजेज 57766 वर पाठवा त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल मिळून जाईल.

दरम्यान, राज्य शासन शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षा घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं वर्षे वाया जात नाही. त्यामुळे नापास झालेल्या किंवा ज्यांना आपल्या गुणांमध्ये वाढ करायची आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा एक चांगली संंधी आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.