ऐन दिवाळीत एसटी प्रवास महागला, तब्बल 17 टक्क्यांनी तिकीट दरात वाढ

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीटवाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तिकीटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज (25 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.

ऐन दिवाळीत एसटी प्रवास महागला, तब्बल 17 टक्क्यांनी तिकीट दरात वाढ
Sm'r ym
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 5:48 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज (25 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.

तिकीट दरात तब्बल 17 टक्‍क्‍यांची वाढ

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ वाढ झाली. इंधन महागल्यामुळे आर्थिक गणितं जुळवताना एसटी महामंडळाची दमछाक होत होती. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दीपावली हा सण साजरा करण्यासाठी चाकरमाने शहरातून आपापल्या गावी जातात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असतानाही एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचा डोलारा सांभाळण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय

एसटीची यापुर्वीची भाडेवाढ जून 2018 मध्ये झाली होती. दरवाढीनंतर गेल्या दोन वर्षात डिझेलच्या दरात 25 रुपये वाढ झालीय. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा सांभाळण्यासाठी भाडेवाढीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा तोटा

यापूर्वी भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली होती. समितीचा अहवाल महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात आला. एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोरोनाकाळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले आहे. या सर्व अडचणीतून बाहेर येण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आलीय.

इतर बातम्या :

प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण, सर्व पुरावे क्राईम ब्रँचकडे; समीर वानखेडेंवर मुंबई पोलिस कारवाई करणार?

समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?

Eknath Khadse Bail | एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा, भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर

(Maharashtra State Transport Corporation ST bus ticket fares increased by 17 per cent)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.