लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा, बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे (Maharashtra Task force of paediatricians will guide how to prevent corona in children).

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा, बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स मार्गदर्शन करणार
लहान मुलांना कोरोना संसर्ग प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:44 PM

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे (Maharashtra Task force of paediatricians will guide how to prevent corona in children). या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग् तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. डॉ.सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. हे तज्ज्ञ डॉक्टर पालकांना याबाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना देणार आहेत.

राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन

लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे येत्या रविवारी म्हणजेच 23 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रम कसा बघाल?

हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युट्यूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ येथे थेट पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक बाल रोग तज्ञांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन बाल रोग तज्ञ संघटनेचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ जयंत पांढरीकर यांनी देखील केले आहे.

तिसरी लाट येणारच का?

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही यावर डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांमध्येच बरेच मतभेद सुरु आहेत. कारण, कोणत्याही साथीचा प्रकोप नेमकी कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. केवळ पीक पॉईंटच्या काळात रोगाच्या साथीचा प्रभाव प्रचंड असतो. भारतामधील विविध राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कमी-अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे.

कोरोनाची तिसरी लाट कशी असेल?

अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल. साधारणत: कोणत्याही साथीच्या रोगाची दुसरी लाट ही पहिल्याच्या तुलनेत दुबळी असते. कारण तोपर्यंत लोकांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. मात्र, कोरोनाच्या विषाणुंमध्ये होणारे म्युटेशन पाहता असा ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय मानला जात आहे.

संबंधित बातमी : कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, निती आयोगाचा दिलासादायक दावा

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.