महाराष्ट्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात मागे, फक्त 83.32 टक्के लसीकरणः डॉ.सुभाष सरकार
भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार करून एक ऐतिहासीक कामगिरी केली आहे. मात्र महाराष्ट्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणामध्ये बाकी राज्यांपेक्षा मागे पडला आहे, असं राज्य शिक्षण मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी सांगीतलं.
नवी दिल्लीः भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार करून एक ऐतिहासीक कामगिरी केली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार गुरूवार सकाळप्रर्यंत एकुण पात्र जनतेपैकी 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 31 टक्के लोकंना दोन्ही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. ज्या गटातील लोकांना (फ्अंट लाइन कर्मचारी) लसीकरण मोहिमेत प्राधान्य दिले गेले त्या गटात शिक्षकांचा ही समावेश होता. मात्र महाराष्ट्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणामध्ये बाकी राज्यांपेक्षा मागे पडला आहे, असं राज्य शिक्षण मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी सांगीतलं. न्यूज 9 शी ते बोलत होते.
महाराष्ट्रात शिक्षक कर्मचाऱ्यांचं फक्त 83.32 टक्के लसीकरण
सरकार म्हणाले की काही राज्यांनी 100 टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच लसीकरण पूर्ण केले आहे मात्र काही राज्य यात मागे पडले आहेत. महाराष्ट्रात शिक्षक कर्मचाऱ्यांचं फक्त 83.32 टक्के लसीकरण झालं आहे. महाराष्ट्रासारखं मोठं राज्य मागे पडणं ही एक गंभीर गोष्ट आहे. देशात इतर राज्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या लसीकराणाचं उद्धीष्ट पूर्ण केले आहे आणि त्यात हिमाचल प्रदेश, लदाखसारख्या कठीण राज्यांचाही समावेश आहे. तर महाराष्ट्राने अजून चांगले केले पाहीजे होते.
इतर काही राज्यांचे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे टक्के
गोवाः 91.28% गुजरातः 97.20% हिमाचल प्रदेशः 99.54% लदाखः 100% लक्षद्वीपः 100% अंदमान निकोबारः 100% पुद्दुचेरीः 96.12% सिक्कीमः 98.45%
विद्यार्थ्यांचं लसीकरण
वैज्ञानिक मुल्यमापन झाल्यावर आणि योग्य वेळ आली की विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थ्यांच लसीकरण करणे आव्हान आहे आणि एक लक्ष्य निर्धारित करावे लागेल. योग्य वेळ आल्यावर शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण अनिवार्य करायचं का, याचा निर्णय घेतला जाईल.
इतर बातम्या