22 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, आता तापमान वाढीतून सुटका मिळणार का?

22 April 2023 Maharashtra City-Wise Temperature / Heat Wave Today News : राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. एकीकडी तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले असताना दुसरीकडे आयएमडीने पुढील चार दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

22 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, आता तापमान वाढीतून सुटका मिळणार का?
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 1:34 PM

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात तापमान वाढीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. उष्माघातासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अवकाळी पावसापासून अजूनही शेतकऱ्यांची सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे.

काय आहे अंदाज

येत्या तीन-चार दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटीसह अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस व गारपीट २२ ते २५ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २४ व २५ एप्रिल रोजी पाऊस पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसे आहे तापमान

राज्यातील काही शहरांचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. राज्यात चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस होते. जळगाव, अकोला, अमरावतीचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. पुणे आणि मुंबईचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या आत आहे.

Maharashtra temperature on 21 th April 2023
शहर तापमान
जळगाव ४१.७
अकोला ४०.५
मुंबई ३७.३
पुणे ३८.४
नागपूर ३९.५
नाशिक ३६.६

ही काम कराच

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.‌ शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध झालेली, गोंधळलेली, सतत घाम येत असलेली व्यक्ती थांबलेली दिसल्यास त्वरित १०२/१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य केंद्रांकडून केले आहे.

अशी घ्या काळजी

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करिता संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. शरीराचे तापमान १०४ फेरहाईटपर्यंत किंवा ४० डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून येत आहे. यामुळे शारीरिक स्वास्थाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.‌ ही लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे टाळा

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते तीन या वेळेत घराबाहेर जाऊ नये. सैलसर व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी. दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.