25 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट, तापमानातून दिलासा मिळाला का?

25 April 2023 Maharashtra City-Wise Temperature : राज्यातील तापमानाचा पार थोडा कमी झाला आहे. एकीकडे उन्हातून दिलासा मिळत असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे.

25 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट, तापमानातून दिलासा मिळाला का?
IMD
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 9:20 AM

पुणे : राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले होते. त्यातून सोमवारी थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. मार्च महिन्यानंतर आता संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील पुढील तीन- चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २५ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

राज्यात २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. कोकण अन् गोव्यात २५ रोजी हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर २६ ते २८ दरम्यान काही ठिकाणी जोरदार विजांचा कडकडाट मेघगर्जना व गारपीट होण्याची शक्यताही वर्तविली असून जोराचे वादळ देखील येवू शकते. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ आणि २८ रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट आहे. पुणे शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

तापमान वाढीतून किंचित दिलासा

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे . जळगावमध्ये सर्वाधिक ३९ अंश तापमान नोंदवले गेले होते. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात वाढ आहे.

मुंबईकरांना दिलासा

राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास असताना मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईचे तापमान ३२ अंशावर होते. पुणे शहराचे तापमान ३६.१ अंशावर होते.

Maharashtra temperature
शहर तापमान
जळगाव 39
अकोला 38.3
मुंबई 32
पुणे 36.1
नागपूर 35.3
नाशिक

चंद्रपूर

36

38.2

चंद्रपूरला वादळी पावसाचा शाळेला फटका

चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकदरुर  येथील इंदिरा गांधी हायस्कूल वादळी वाऱ्याने उडून गेले. योगायोगाने  शाळेत कुणी हजर नसल्याने मोठी हानी टळली. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात विचित्र वातावरण सुरू आहे. दिवसभर लाहीलाही करणारी ऊन अन पाच वाजता नंतर वादळी पाऊस  जिल्ह्यात बघायला मिळत आहे. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे.  वादळी पावसाने या चार दिवसात अनेक घरांची पडझड झालेली आहे.

नाशिकला ऑरेंज अलर्ट

नाशिकला पुढचे चार दिवस पुन्हा धोक्याचे आहे. नाशिक जिल्ह्याला उद्यापासून पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिकला बेमोअमी पावसाचा पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील हजारो हेक्टर पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.