अभिजित पोटे, पुणे : राज्यातील तापमान दोन दिवसांपासून स्थिर आहे. तापमान ४० अंश सेल्सियसच्या आत राहिले आहे. त्याचवेळी विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केलाय. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30-40 किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी सकाळी पावसाला सुरुवात झालीय. मावळ तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
पुणे ऑरेंज अलर्ट जारी
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान सुरु आहे. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. यामुळे मतदारांची तारांबळ उडाली. पावसाचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील हडपसर ,स्वारगेट, कात्रज या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra temperature | |
शहर | तापमान |
जळगाव | 39.6 |
अकोला | 37 |
मुंबई | 32.7 |
पुणे | 36.7 |
नागपूर | 33.9 |
नाशिक
अमरावती |
36.6
35.4 |
भोर तालुक्यात पाऊस
पुण्याच्या भोर तालुक्यात सकाळ पासूनचं विजांच्या कडकडाटासह पाऊसानं हजेरी हजेरी लावलीय. सकाळी सुमारे 7 च्या सुमारास सुरू झालेल्या पावसानं, तालुक्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय.अचानक पाऊस सुरू झाल्यानं अनेकांची सकाळची कामं खोळंबलीयत, तर कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालीय.
लातूरमध्ये अवकाळी, एकाचा मृत्यू
लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर सहा जनावरे दगावली आहेत. अवकाळीमुळे आंबा बाग आणि भाजीपाला शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पाऊस आल्याने आडत बाजारातही एकच धावपळ झाली.
नाशिकमध्ये 77 कोटीचा निधी देण्याची मागणी
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी 77 कोटीचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात 7 ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने 43 हजार 400 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक 35 हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले.