Maharashtra Temperature : तापमानातून दिलासा, पण चार दिवस गारपीट अन् अवकाळीचे संकट

| Updated on: Apr 29, 2023 | 10:09 AM

Maharashtra City-Wise Temperature : राज्यातील तापमान ४० अंशाच्या आत आहे. परंतु राज्यात चार दिवस पावसाचे आहे. पुणे आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केलाय.

Maharashtra Temperature : तापमानातून दिलासा, पण चार दिवस गारपीट अन् अवकाळीचे संकट
राज्यात अवकाळीचे संकट
Image Credit source: tv9 network
Follow us on

पुणे : राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील उन्हाचा चांगलाच फटका बसला. परंतु एप्रिल संपत असताना तापमान ४० च्या आत स्थिर राहिले. आता मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारत या भागात मे महिन्यातील तापमान ४० अंशांच्या पुढे असणार आहे. परंतु इतर भागात तापमान ४० अंशाच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. परंतु एप्रिल महिना संपत असताना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा अंदाज बघूनच शेती कामे हाती घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या तापमान ४० अंशांच्या आत का?

हे सुद्धा वाचा

सध्या देशभरातच कमी उष्णतेचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून हवेत जास्त आर्द्रता जास्त आहे. यामुळे ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे तापमान सध्या ४० अंशांच्या आत आहे.

 

 

Maharashtra temperature
शहर तापमान
जळगाव ३७.७
अकोला ३५.८
मुंबई ३३.२
पुणे ३५-६
नागपूर ३३.६
नाशिक

सोलापूर

३५.८

३९

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. २९ व ३० एप्रिल रोजी तसेच १ व २ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस

जळगाव जिल्ह्यात भुसावळसह अनेक तालुक्यात गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस गारपीटसह वादळी वाऱ्याने झोडपले. गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. भुसावळच्या साकेगावात जिल्हापरिषदेच्या शाळेचे पूर्ण छतच उडून गेले. तसेच इतरही नुकसान झाले. चोपडा तालुक्यातील काही परिसरामध्ये गारपीट झाली.

नाशिकमध्ये 77 कोटीचा निधी देण्याची मागणी

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी 77 कोटीचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात 7 ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने 43 हजार 400 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक 35 हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले.