Maharashtra Temple Reopening Live Update | सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना

| Updated on: Oct 07, 2021 | 8:09 PM

तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.

Maharashtra Temple Reopening Live Update | सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना
Shardiya-Navratri

मुंबई : तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुजळापुरातील भवानी मातेचं मंदिर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Oct 2021 03:57 PM (IST)

    तळकोकणातील प्रसिद्ध  देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरही आजपासून सुरु

    कोरोना कालावधीत बंद असलेली मंदिरे शासनाने आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर खुली केली. तळकोकणातील प्रसिद्ध  देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरही आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. देवगडमधील उद्योजक नंदकुमार घाटे यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. कोरोना महामारीत दोन वर्षे आर्थिक झळ मंदिर प्रशासनाला बसली होती. मात्र नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच शासन निर्णय मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंदिर प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला असल्याचे मत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाचे सर्व निर्बंध पाळूनच प्रवेश दिला जाणार असल्याचे ही वाळके यांनी सांगीतले.

  • 07 Oct 2021 03:55 PM (IST)

    सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना

    सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली आहे, गेल्या साडे सहा महिन्यापासून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र राज्य सरकारच्या आदेशानुसार आज नवरात्र उत्सवाच्या शुभमुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली आहेत. प्रतिवर्षी रुपाभवानी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते यंदा मात्र भाविकांना दर्शनासाठी अटी व नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात प्रत्येक दोन तासात सहाशे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रुपाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जवळ दोन लस घेतल्याचा संदेश किंवा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याची तपासणी करूनच पोलीस भाविकांना दर्शनासाठी पाठवत आहेत.

  • 07 Oct 2021 02:51 PM (IST)

    तिरुमाला तिरूपती विश्वस्त मंडळाची पहिली बैठक पार पडली

    तिरुमाला तिरूपती विश्वस्त मंडळाची आज पहिली बैठक पार पडली.

    महाराष्ट्रातून सदस्य पदी नियुक्ती झालेल्या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांना श्री सिद्धिविनायकाची मूर्ती भेट दिली.

  • 07 Oct 2021 02:50 PM (IST)

    तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर प्रभाव कायम, तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार

    पणजी (पणजी) :

    तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर प्रभाव कायम.

    आजपासून पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार.

    ताशी ४० किमी वेगाने वारेही वाहण्याची शक्यता.

    तळकोकणातही मुसळधार पावसाची शक्यता

  • 07 Oct 2021 02:02 PM (IST)

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात घटस्थापना संपन्न

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली यावेळी 7 प्रकारचे वेगवेगळे धान्य घटात पूजा करून टाकण्यात आले. यात जे धान्य वाढेल तेच रब्बी हंगामात शेतकरी पेरतो अशी प्रथा आहे. पूजारी मानकरी यांच्या उपस्थितीत वाजत गाजत पूजा करून घटस्थापना करण्यात आली

  • 07 Oct 2021 12:51 PM (IST)

    नवरात्रीचे नऊ दिवस मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे घालणार देवीकडे गाऱ्हाणी

    नवरात्रीचे नऊ दिवस मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे घालणार देवीकडे गाऱ्हाणी

    राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी देवीकडे मागणार दान

    राज्यातील जनतेचे नऊ प्रश्न गाऱ्हाणी घालून सरकारपुढे मांडणार

  • 07 Oct 2021 12:13 PM (IST)

    वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचेही दरवाजे आजपासून भक्तांसाठी खुले

    12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचेही दरवाजे आजपासून भक्तांसाठी खुले

    पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

  • 07 Oct 2021 11:22 AM (IST)

    टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईचे मंदिर उघडण्यात आले

    मुक्ताईनगर –

    टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईचे मंदिर उघडण्यात आले

    शासनाच्या नियमानुसार

    मात्र विषेशता आज आदिशक्ती मुक्ताई चा जन्मदिवस असल्याने मंदिरामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहेत

    दोन वर्षानंतर महाराष्ट्र भरातील भाविकांचे आराध्य दैवत व महत्त्वाचे तीर्थ क्षेत्र असणारे आदिशक्ती मुक्ताईचे मंदिर आज उघडण्यात आले

    आज सकाळपासून मंदिरात पूजाअर्चा मंदिर प्रशासनाच्या वतीने महाआरती करण्यात आली

  • 07 Oct 2021 11:22 AM (IST)

    मंदिरे उघडण्यात आल्याने भाजपतर्फे आनंदोत्सव

    जळगाव – मंदिरे उघडण्यात आल्याने भाजपतर्फे आनंदोत्सव

    भाजप ने केलेल्या संघर्षामुळे सरकार वठणीवर आल्याने साजरा होतोय आनंदोत्सव

  • 07 Oct 2021 11:21 AM (IST)

    नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवीचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी झालं खुलं

    – नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवीचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी झालं खुलं

    – नवरात्र उत्सवामुळे भाविकांची दर्शनासाठी रीघ

    – ई-पास द्वारे दिल जातंय भाविकांना दर्शन

    – कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन

  • 07 Oct 2021 09:50 AM (IST)

    विरारचे प्रसिद्ध जीवदानी देवी देवस्थान भक्तांसाठी आज पासून सुरु

    विरार –

    विरारचे प्रसिद्ध जीवदानी देवी देवस्थान भक्तांसाठी आज पासून सुरु

    देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर यांच्या हस्ते आज सकाळी 6 वाजता गेट उघडून भक्तांना दिला प्रवेश

    दीड वर्षांपासून शुकशुकाट असणाऱ्या जीवदानीचा डोंगर आज भक्तांनी फुलून गेला आहे

  • 07 Oct 2021 09:49 AM (IST)

    मंदिर उघडल्याचा आनंदात भाजपचा आनंदोत्सव सुरू

    औरंगाबाद –

    मंदिर उघडल्याचा आनंदात भाजपचा आनंदोत्सव सुरू

    गजानन महाराज मंदिरात आरती करून आनंद उत्सव सुरू

    आरतीसाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित

    मंत्री भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर आरती साठी उपस्थित

  • 07 Oct 2021 09:29 AM (IST)

    अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराची दारं अखेर उघडली

    अंबरनाथ :

    अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराची दारं अखेर उघडली

    शिवभक्त आणि मंदिराच्या पारंपरिक पुजाऱ्यांनी उघडलं मंदिराचं दार

    तब्बल अठरा महिन्यानंतर भाविकांना घेता येणार महादेवाचं दर्शन

    भाविक आणि पुजाऱ्यांचा हर हर महादेवचा जयघोष

  • 07 Oct 2021 08:57 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबादेवी मंदिरात पोहोचले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबादेवी मंदिरात पोहोचले

    महापौर, उपमहापौरही दर्शनासाठी उपस्थित

  • 07 Oct 2021 08:48 AM (IST)

    नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग

    – अखेर देवालये झाली खुली

    – आजपासुन राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली

    – घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरांत दर्शनाची परवानगी

    – नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग

    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करून मंदिरात प्रवेश

    – पहाटेच्या वेळी त्रंबक राज्याला दुग्धाभिषेक, जलाभिषेक

    – भाविकांमध्ये मंदिरे खुली झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण

  • 07 Oct 2021 08:46 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मोहाडी शहरातील माँ चौंडेश्वरी देवीचे मंदीर तब्बल दीड वर्षांनंतर खुले

    भंडारा

    – तब्बल दिड वर्षानंतर नवरात्रीचा पहिल्याच दिवशी आज मंदिराचे दार उघण्यात आले

    – भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मोहाडी शहरातील माँ चौंडेश्वरी देवीचे मंदीर तब्बल दीड वर्षां नंतर उघण्यात आले.

    – आज मंदिर उघडल्याने भाविकांनी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती,

  • 07 Oct 2021 08:19 AM (IST)

    औरंगाबाद शहराची ग्रामदेवता असलेल्या कर्णपुरा मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले झाले 

    औरंगाबाद शहराची ग्रामदेवता असलेल्या कर्णपुरा मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले झाले

    मंदिर खुले झाल्याच्या पहिल्याच दिवशी आज औरंगाबाद शहरातील शेकडो भाविकांनी कर्णपुरा मंदिरात प्रचंड गर्दी केली होती

    आजपासून कर्णपुरा देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवालाही सुरुवात झाली आहे

    इथून पुढे सात दिवस या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत

    मंदिर संस्थानचे अध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी देवीची पूजा अर्चा करून मंदिर भाविकांसाठी खुले केले

  • 07 Oct 2021 08:17 AM (IST)

    नगर जिल्ह्यातल्या या 6 मंदिरांसाठी कलम 144 लागू

  • 07 Oct 2021 08:13 AM (IST)

    भाविकांनी काळजी घेवूनच दर्शन घ्यावं, धनंजय मुंडे यांचं भक्तांना आवाहन

  • 07 Oct 2021 08:12 AM (IST)

    शनि शिंगणापूर देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुले

  • 07 Oct 2021 08:12 AM (IST)

    शिर्डीचे साईबाबा मंदिर उघडले, काकड आरतीला भाविकांची गर्दी

  • 07 Oct 2021 08:10 AM (IST)

    दगडूशेठ गणपती मंदिर आज भक्तांसाठी खुलं करण्यात आले

    दगडूशेठ गणपती मंदिर आज भक्तांसाठी खुलं करण्यात आले

    दगडूशेठच्या दर्शनासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर खासदार वंदना चव्हाण यांनी उपस्थिती लावली

    राज्यातील सर्व मंदिरांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आज सकाळपासून दर्शन घेण्यासाठी धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत

    राज्यातील सर्व संकट दूर व्हावं अस साकडं घालत आहेत

    कोरोना नियमांचा सर्वांनी पालन करावे असे आव्हान रुपाली चाकणकर यांनी केलं आहे

  • 07 Oct 2021 08:08 AM (IST)

    पिंपरी चिंचवड मध्ये 4 नगरसेवकांना गंडा घालणाऱ्याला सांगवी पोलिसांकडून अटक करण्यात आलीये

    पिंपरी चिंचवड –

    – पिंपरी चिंचवड मध्ये 4 नगरसेवकांना गंडा घालणाऱ्याला सांगवी पोलिसांकडून अटक करण्यात आलीये

    -सुरज वाघ असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

    -मुलीचा अपघात झाल्याचे सांगत ती वाय सी एम रुग्णालयात आहे आणि उपचारासाठी पैसे द्या अस सांगत नगरसेवकांना फोन लावत सुरज ने पैशांची मागणी केली होती

    -त्या मध्ये चार नगरसेवकांनी गुगल पे करत सुरज ला पैसे पाठवले होते

    -सांगवी मधील नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केल्यानंतर असा अपघात झालेली मुलगी रुग्णालयात नसल्याचे लक्षात आल्यावर त्या विरोधात सांगवी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता

    -त्या नंतर पोलिसांनी तपास करत सुरज ला नाशिक मधून अटक केलीय

  • 07 Oct 2021 08:07 AM (IST)

    देहूगावातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर ही आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले

    पुणे –

    – देहूगावातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर ही आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले

    – कोरोनाचे नियम पाळत राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटी नुसार मंदिर खुले करण्यात आलाय

  • 07 Oct 2021 08:03 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील सिद्धीविनायकाच्या चरणी

  • 07 Oct 2021 07:54 AM (IST)

    सप्तशृंगी देवीचे दागिने मंदिराच्या गाभाऱ्यात दाखल

    नाशिक – सप्तशृंगी देवीचे दागिने मंदिराच्या गाभाऱ्यात दाखल

    थोड्याच वेळात देवीला घातले जाणार अलंकार..

    सोन्याचे मुकुट आणि पादुका गाभाऱ्यात दाखल

  • 07 Oct 2021 07:54 AM (IST)

    लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचे मंदिर अखेर भाविकांसाठी खुले

    पुणे

    -लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचे मंदिर अखेर भाविकांसाठी खुले

    -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुलदेवी कार्ला येथील एकविरा देवीचे मंदिर आज अखेर भाविकांसाठी खुले झालेय

    -एकविरा गडावर मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टसन्स हे बंधनकारक असणार आहे

    -आज पहाटे 5 वाजता तब्बल दीड वर्षानंतर भाविकांसाठी मंदिरे खुली झाली आहेत.त्यामुळे एकविरा गडावर आज भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे

  • 07 Oct 2021 07:54 AM (IST)

    चांदवड येथील रेणुका देवीच्या मंदिरात महापूजेला सुरुवात

    नाशिक – चांदवड येथील रेणुका देवीच्या मंदिरात महापूजेला सुरुवात

    घटस्थापने निमित्त आज चांदवडच्या रेणुका माता मंदिरात पूजेला सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या हस्ते पूजेला सुरूवात

  • 07 Oct 2021 07:46 AM (IST)

    अखेर सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिर खुले

    सांगली –

    अखेर सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिर खुले

    भक्तांनी सकाळी सहा वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी केली गर्दी

  • 07 Oct 2021 07:45 AM (IST)

    साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेलं सप्तशृंगी देवी मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले

    नाशिक –

    साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेलं सप्तशृंगी देवी मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले

    आज दिवसभर मंदिर राहणार खुले

    एक दिवसात 24 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी

    भाविकांना दर्शनासाठी पासची सुविधा

    कोरोना नियमांचं पालन करत दर्शन घेण्याच्या भाविकांना सूचना

    थोड्याच वेळात पालकमंत्री छगन भुजबळ घेणार सप्तश्रृंगी देवीचे दर्शन

  • 07 Oct 2021 07:41 AM (IST)

    नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या बाजार पेठेत झालेली गर्दी बघता प्रशासन अलर्टवर

    नाशिक –

    नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या बाजार पेठेत झालेली गर्दी बघता प्रशासन अलर्टवर

    नागरिकांनी बाजार पेठेत या काळात गर्दी करू नये

    मास्क,सोशल डिस्टन्सचा वापर करावा अन्यथा कोरोनाला निमंत्रण ठरू शकत

    तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी नियमांचं पालन करावं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचं आवाहन

  • 07 Oct 2021 07:40 AM (IST)

    नाशकातील मंदिर आजपासून होणार भाविकांसाठी खुली

    नाशिक –

    मंदिर आजपासून होणार भाविकांसाठी खुली

    नियमांचं पालन करण अनिवार्य

    नियमांना धरूनच भाविकांना दिल जाणार दर्शन

    मास्क,वेळोवेळी सॅनिटायझेशन करावं लागणार

    अनेक दिवसानंतर आज मंदिरांचा दार उघडणार

  • 07 Oct 2021 07:39 AM (IST)

    संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर ही आज पासून भाविकांसाठी खुले

    पुणे

    -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर ही आज पासून भाविकांसाठी खुले झाले आहे

    -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार मंदिर खुले करण्यात आलय

    -मंदिर उघडले असले तरी गाभाऱ्यात मात्र भाविकांना प्रवेश नसणार आहे

    -दर दोन ते अडीच तासांनी साफसफाई साठी मंदिर अर्धा तास बंद राहणार आहे

  • 07 Oct 2021 07:38 AM (IST)

    अनेक दिवसानंतर मंदिर उघडली, व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

    शिर्डी

    अनेक दिवसानंतर मंदिर उघडली,

    व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

    प्रसाद, पुजेचं साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी,

    आजपासून सगळं सुरळीत होईल व्यापाऱ्यांची भावना,

  • 07 Oct 2021 07:38 AM (IST)

    नागपुरात नवरात्री उत्सवाची तयारी, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

    नागपुरात नवरात्री उत्सवाची तयारी

    प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

    नागपूर शहरात दुर्गा देवी स्थापने साठी 436 ,तर जिल्ह्यात 410 मंडळांनी मागितली परवानगी

    नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी कसली कंबर

    चार हजार पोलीस राहणार तैनात

    शहर आणि जिल्ह्यातील आखणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि ग्रामीण एसपी विजय कुमार मगर यांनी केली

  • 07 Oct 2021 07:36 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले

  • 07 Oct 2021 07:35 AM (IST)

    शिर्डीतील साईबाबांच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

    शिर्डी,

    शिर्डीतील साईबाबांच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी,

    ऑनलाईन पास काढून दर्शनाचीही सोय उपलब्ध,

    पास काढण्यासाठी भाविकांची गर्दी,

    मात्र ऑनलाईन पास असेल तरच मिळणार दर्शन,

    भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण

  • 07 Oct 2021 07:34 AM (IST)

    शनिशिंगणापूर देवस्थान आजपासून भक्तांच्या दर्शनासाठी खुले

    अहमदनगर

    शनिशिंगणापूर देवस्थान आजपासून भक्तांच्या दर्शनासाठी खुले

    ग्रामस्थ , व्यवसायिक आणि भाविकांमध्ये कमालीचा उत्साह

    तर कर्मचाऱ्यांनकडून मंदिर परिसरात स्वछता करण्याचे काम सुरू.

    शनी दर्शनासाठी भाविक येण्यास सुरू

    तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून भक्तांनी दर्शन घ्यावे मंदिर पुजार्यांनी केले आवाहन

  • 07 Oct 2021 07:28 AM (IST)

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामीं दर्शनाचा मार्ग मोकळा

    सोलापूर –

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामीं दर्शनाचा मार्ग मोकळा

    अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचं द्वार उघडून भाविकांच्या स्वामी दर्शनास प्रारंभ

    श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना दर्शनाकरीता उघडण्यात आले

    गेल्या साडे सहा महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असलेले भाविक आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने व श्रध्देय भक्ती भावाने उपस्थित

  • 07 Oct 2021 07:27 AM (IST)

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे दरवाजे उघडले 

    कोल्हापूर

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे दरवाजे उघडले

    पहाटे पाचच्या सुमारास उघडले गेले मंदिराचे दोन दरवाजे

    8 च्या सुमारास होणार घटस्थापनेला सुरुवात

    ऑनलाइन नोंदणीच्या पहिल्याच दिवशी 30 हजार भाविकांनी केली नोंदणी

    नोंदणी केलेल्या भाविकांच दिला जातोय मंदिरात प्रवेश

  • 07 Oct 2021 07:14 AM (IST)

    दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दारं राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उघडले

    कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेली अनेक महिने असलेले म्हणजे आज खुली झाली

    पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते मंदिर उघडल्यानंतर पहिली आरती करण्यात आली

    मंदिर खुली करत असताना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केलं असताना दगडूशेठ हलवाई मंदिरात मात्र सोशल डिस्टटिंगचा फज्जा उडल्याच पहायला मिळाल

  • 07 Oct 2021 07:12 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षशात घेता नवरात्रीनिमित्त जिल्ह्यात 6 मंदिरांमध्ये 144 कलम लागू

    अहमदनगर –

    जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षशात घेता नवरात्रीनिमित्त जिल्ह्यात 6 मंदिरांमध्ये 144 कलम लागू

    ऑनलाईन पास घेऊन घेता येणार दर्शन

    एक देवस्थानाच्या ठिकाणी रोज 5000 हजार भाविकांना दर्शन घेता येणार

    कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आदेश

    आजपासुन 20 तारखेपर्यंत नियम लागू

    अहमदनगर जिल्ह्यात या धार्मिक स्थळाप्रार्थना स्थळाचे ठिकाण 144 कलम लागू

    1. श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे, ता.पाथर्डी ( मोहटा देवी मंदीर).. 2. श्री जगदंबा देवी मंदीर, राशीन, ता.कर्जत 3. रेणूका माता देवी मंदीर, केडगांव ता.अहमदनगर 4 रेणूका माता देवी मंदीर, एम.आय.डी.सी., अहमदनगर 5 रेणूका माता देवी मंदीर, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, अहमदनगर 6 तुळजा भवानी मंदीर, बु-हाणनगर ता.अहमदनगर

  • 07 Oct 2021 07:10 AM (IST)

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दार पहाटे चार वाजता उघडले

    पंढरपूर –

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दार पहाटे चार वाजता उघडले

    दार उघडल्यानंतर देवाचे नित्योपचार झाले सुरु

    गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले श्री विठ्ठलाचे मंदिर आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर उघडले

    मंदिर उघडल्याच्या आनंदा प्रीत्यर्थ विठ्ठल भक्त राम जांभूळकर यानी विठ्ठला प्रिय असलेल्या तुळशी सह विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवले विठ्ठलाचे मंदिर

    सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना मुख दर्शनासाठी मंदिर राहणार खुले

    आज सकाळी 6 वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकाना दिले जाणार सावळ्या विठुरायाचे दर्शन

    दररोज दहा हजार भाविकाना मिळणार श्री विठ्ठलाचे दर्शन

  • 07 Oct 2021 07:08 AM (IST)

    कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची मूर्ती ही आज पहाटे 2 वाजता सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली

    कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची मूर्ती ही आज पहाटे 2 वाजता सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली

    महाराष्ट्रातील खास देवी भक्तांसाठी तुळजाभवानी देवीचा मंचकी निद्रा रुप आणि त्यानंतर सिंहासनावर ठेवण्यात आलेले पहिल्या मूळ अष्टभुजा मूर्तीच्या रूपाचे दर्शन

  • 07 Oct 2021 07:07 AM (IST)

    कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा आज संपली

    कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा आज संपली

    तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती ही शेजघरातून आज सिंहसनावर प्रतिष्ठित करण्यात आली

    देवीची मंचकी निद्रा ही 3 स्वरूपाची असते व तुळजाभवानी ही भारतातील एकमेव चल मूर्ती असून ती सिंहासनावरून निद्रेसाठी हलविली जाते

Published On - Oct 07,2021 7:02 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.