AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन दिवस, तीन नेते, काँग्रेस आमदार, नाशिक नगरसेविका आणि आता भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाचा कोरोनामुळे मृत्यू

गेल्या तीन दिवसात राज्यात तीन महत्त्वाच्या नेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra Three Leaders died due to corona)

तीन दिवस, तीन नेते, काँग्रेस आमदार, नाशिक नगरसेविका आणि आता भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाचा कोरोनामुळे मृत्यू
लक्ष्मण वरखंडे, कल्पना पांडे, रावसाहेब अंतापूरकर
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 12:46 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक राजकीय नेते, समाजसेवक, सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होत आहेत. महाराष्ट्रातील काही नेत्यांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे. गेल्या तीन दिवसात राज्यात तीन महत्त्वाच्या नेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra Three Leaders died due to corona)

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडेंचा मृत्यू

नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रणरागिनी अशी त्यांची ओळख होती

कल्पना पांडे यांचा अल्प परिचय

कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या. नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे कोरोना काळातही त्या फ्रंटालाईनवर उतरुन काम करत होत्या. कोरोना काळात रुग्णाला रुग्णालय मिळवून देणे, औषधाची सोय करणे, जनजागृती करणं, यासारखी अनेक लोक हिताची कामं त्यांनी केली.

कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती.  अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्या नेहमीच स्पष्ट भूमिका मांडत.

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचे कोरोनामुळे निधन 

तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 4 एप्रिलला त्यांच्यावर गुजरातमधील वापीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण वरखंडे कोरोनाशी झुंज देत होते.

पण त्यांची कोरोनाची झुंज अपयशी ठरली आहे. लक्ष्मण वरखंडे यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकरांचा मृत्यू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. सामान्यांशी नाळ जोडलेला आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती.

साधारण 25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता.

कोण होते रावसाहेब अंतापूरकर?

सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील जयंतराव उर्फ रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

संबंधित बातम्या :

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

शिवसेनेच्या रणरागिणीला कोरोनाने गाठलं, नाशिकच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन

Raosaheb Antapurkar: दोनवेळा आमदारकी मिळवली, पण शेवटपर्यंत भाड्याच्या घरातच मुक्काम

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.