IMD Rain: दिवाळीत राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा काय?

imd prediction: हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड या भागात यलो अलर्ट दिला आहे. कोकणात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

IMD Rain: दिवाळीत राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे भात शेतीचे झालेले नुकसान
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:58 AM

दिवाळीत राज्यातील काही भागात पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या पावसामुळे वाळत घातलेल पीक पावसात भिजले आहे. हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

कोकणात मुसळधार पावसामुळे भात वाहून गेला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात भात कापणीला वेग आला आहे. कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बुधवारी आलेल्या पावसामुळे कापून वाळत घातलेले भात मुसळधार पाऊस कोसळल्याने वाहून गेला आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाळत घातलेले भात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत सणात शेतकऱ्यांवर परतीच्या पावसामुळे संकट ओढवले आहे.

विदर्भातील भात शेतीचे नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सध्या भातशेतीची कापणीची वेळ असून दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. गडचिरोलीमधील दक्षिण भागातील अहेरी सिरोंचा या तालुक्यातील अनेक भागात भात व कापूस शेतीचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या भागात भात शेतीची कापणी होत असते.

हे सुद्धा वाचा

कोकणात परतीचा पावासाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने ऐन दिवाळीत कोकणात परतीचा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बुधवारी सायंकाळनंतर रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा गुरुवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शेतीमाल उघड्यावर असल्यामुळे या पावासाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड या भागात यलो अलर्ट दिला आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.