Maharashtra Vidhan Sabha Live : हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं! विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली, सभागृहात घोषणाबाजी

| Updated on: Dec 29, 2021 | 1:09 AM

Maharashtra Vidhan Sabha Live day 5 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021 day 5) आज अखेरचा दिवस आहे.

Maharashtra Vidhan Sabha Live : हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं! विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली, सभागृहात घोषणाबाजी
Maharashtra Vidhan Sabha live

Maharashtra Vidhan Sabha Live Day 5: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरुन राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झालेला आहे. आज अध्यक्षांची निवडणूक होते का हे पाहावं लागणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासह भाजप नेते ठाकरे सरकारवर आजही हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तर, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होणार का हे पाहावं लागणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Dec 2021 10:17 PM (IST)

    अधिवेशनात 31 हजार 298 कोटी 26 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या- अजित पवार

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत आहेत. हिवाळी अधिवेशनात 24 विधेयकं मंजूर करुन घेतले. अधिवेशन काळात दोन मंत्र्यांना तसेच इतर 50 जणांना कोरोनाची लागण झाली. सर्वात महत्त्वाचे शक्ती विधेयक मंजूर केले. कृषी विद्यापीठ तसेच महाविद्यालयात शिक्षकांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचं बील दोन्ही सभागृहात मंजूर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये हा ठरावसुद्धा आम्ही एकमताने मंजूर केला. तशी शिफारस आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे. या अधिवेशनात 31 हजार 298 कोटी 26 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. तसेच ओबीसी बांधवाच्या राजकीय आरक्षणाच्या निश्चितीकरीता इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 435 कोटी रुपये मंजूर केले. विदर्भाला ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मंजूर केली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पात टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. पीकविम्याला पर्याय शोधण्याचं काम सुरु आहे. अनेक राज्यात पीकविमा उतरवला जात नाही. त्याऐवजी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. सीमाभागात मराठी बांधवावर होणाऱ्या अन्याविरोधातदेखील तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्या. विधिमंडळ आवारातील सदस्यांच्या गैरवर्तानबद्दल आमदार सुरेश प्रभू यांनी पत्र दिलं होतं. त्यामुळे आज सर्व गटनेत्यांची तसेच प्रमुखांची आणि विरोधी पक्षांची बैठक विधानसभा अध्याक्षांनी बोलावली होती. त्याच्यात चर्चा झाली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप, वीजबील थकबाकी, पेपरफुटी प्रकरण अशा सर्वच गोष्टींना सरकारने उत्तर दिलं. या अधिवेशनात कोरोनाच्या संकटावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री मोहोदयांची शेवटपर्यंत अनुपस्थिती राहिली. अधिवेशन सुरु होण्याआधी त्यांनी सभागृहाची पाहणी केली होती. सध्या ते वर्षा बंगल्यावर असतात. त्यांनी तेथेदेखील काही लोकांशी त्यांनी चर्चा केली. ते अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी आशा होती. पण सर्वच आशा पूर्ण होत नसतात. लवकरच ते आपल्यासोबत असतील अशी आपण त्यांना शुभेच्छा त्यांना देऊ.

  • 28 Dec 2021 10:05 PM (IST)

    प्र-कुलपतीवरुन गैरसमज निर्माण केला जातोय- उदय सामंत

    मुंबई : विरोधक जे म्हणत आहेत, ते चुकीचं आहे..

    प्र-कुलपती वरुन गैरसमज निर्माण केला जातोय..

    त्यांना कसालाही अधिकार नाही..

    सभा ज्यावेळी असेल, राज्यपाल जेव्हा नसतील, तेव्हा कुलगुरुंचा कोणताही अधिकार आम्ही हिरावून घेतलेला नाही..

    कोणाचेही अधिकार आम्ही काढून घेतलेले नाहीत..

    विरोधक जर समर्थन करणार असतील, तर त्यांनादेखील हे पटलंय असं होईल..

    संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत..

    सिनेट मिटिंगला प्र कुलपती जाऊन बसतील, असंही काही नाही..

    राज्यपाल नसतील तेव्हा फक्त प्र-कुलपती जाऊन मीटिंगला बसतील..

  • 28 Dec 2021 09:14 PM (IST)

    हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं!

    हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं!

    विद्यापीठ विधेयकावर फडणवीसांची टीका,

    सरकारला विद्यापिठांवर कब्जा करायचाय- फडणवीस

    सरकारला विद्यपीठं ही राजकीय अड्डे बनवायचे आहेत.

    विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली, सभागृहात घोषणाबाजी

  • 28 Dec 2021 04:20 PM (IST)

    नाना पटोले यांची पत्रकार परिषद सुरू

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे.

  • 28 Dec 2021 12:47 PM (IST)

    Bhaskar Jadhav : आमदारांना मिळणाऱ्या वागणुकीवरुन भास्कर जाधव आक्रमक

    आमदारांना मिळणाऱ्या वागणुकीवरुन भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. पोलीस, शासकीय अधिकारी, महसूल कर्मचारी, डॉक्टर यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीवर भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

  • 28 Dec 2021 12:34 PM (IST)

    Devendra Fadnavis : 12 कोटी जनतेचं आपण प्रतिनिधीत्व करतो हे ध्यानात घ्यावं : देवेंद्र फडणवीस

    12 कोटी जनतेचं आपण प्रतिनिधीत्व करतो हे ध्यानात घ्यावं, म्हणजे आपल्याकडून व्यवस्थित वर्तन होईल, असं  देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 12 महिन्यांकरिता आमदारांचं निलंबन करणं चुकीचं आहे, असं वाटल्यानं समाधान वाटल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आपण आपले नियम पाळले तर न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 28 Dec 2021 12:29 PM (IST)

    Ajit Pawar : लाखो लोकांनी मतदान केल्यावर आपण इथं येतो, प्राण्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही, अजित पवारांकडून शिस्तीचे धडे

    दोन्ही बाजूच्या आमदारांकडून आदर्श वर्तन झालं पाहिजे. लोक प्रतिनिधींच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आता सभागृहातील कामकाजाचं आता थेट प्रक्षेपण केलं जातं. लाखो लोक मतदान करतात त्यावेळी आपण येथे येतो. आपण कुत्री, मांजरं, कोबंड्या यांचं आपण प्रतिनिधीत्व करत नाही, याचं भान राखलं पाहिजे. आपण प्राण्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही,हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता कोणी पण येतेय, इथं येतेय, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे ते तरी लक्षात ठेवलं पाहिजे. एकदाच काय द्यायचं ते द्याना बाबा, अध्यक्ष महोदय शिस्त पाळली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एखादा बोलत असताना पाठ दाखवतात, नमस्कार तर करत नाहीत. अध्यक्ष महोदय,आम्हालाही काही गोष्टी समजत नाहीत. मात्र, काही जण आमदार झाल्यावर सगळं समजतंय, असं वागतात.

  • 28 Dec 2021 12:01 PM (IST)

    Sharad Pawar Uddhav Thackeray : शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, कायदेशीर बाबी‌ तपासल्या आणि अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय

    शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

    कायदेशीर बाबी‌ तपासून केली चर्चा

    त्यानंतर निवडणूक न घेण्याचा झाला निर्णय

    राज्यपालांनी उत्तर दिल्यानं कायदेशीर पेच‌ निर्माण झाला

    त्यामुळं निवडणूक न घेण्याचा‌ निर्णय घेण्यात आला

    राज्यपालांचं उत्तर आलं नसतं तर निवडणूक घेण्याची शक्यता होती

  • 28 Dec 2021 11:54 AM (IST)

    Sudhir Mungantiwar : एका चुकीनं राष्ट्रपती राजवट लागत नाही, पण या सरकारच्या 98 घटनात्मक चुका : सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar : एका चुकीनं राष्ट्रपती राजवट लागत नाही, पण या सरकारच्या 98 घटनात्मक चुका झालेल्या आहेत, असं  सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये, असं आम्हाला वाटतं. राज्यातला एखादा व्यक्ती सुप्रीम कोर्टात गेला तर राष्ट्रपती राजवटीसाठी योग्य स्थिती आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

  • 28 Dec 2021 11:46 AM (IST)

    Uday Samant : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आम्ही घाबरलोय, असं समजत असाल तर ते चुकीचं : उदय सामंत

    विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि राष्ट्रपती राजवट यांचा काडीमात्र संबंध नाही. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्यासाठी कोण कारणीभूत होतं हे जनतेला समजलं आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला हवी होती, असं उदय सामंत म्हणाले. राज्यपाल हे मोठं पद आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आम्ही घाबरलोय, असं समजत असाल तर ते चुकीचं आहे, असं उदय सामंत म्हणाले.

  • 28 Dec 2021 11:37 AM (IST)

    Ajit Pawar : राज्यपालांच्या संमतीविना अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अजित पवारांची असहमती, सूत्रांची माहिती

    Ajit Pawar : राज्यपालांच्या संमतीविना अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अजित पवारांची असहमती होती, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. अजित पवार यांनी घटनात्मक पेच टाळण्यासाठी असहमती दर्शवल्याची माहिती आहे.

  • 28 Dec 2021 11:30 AM (IST)

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही, सूत्रांची माहिती

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मत डावलून घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळं या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक घ्यायला नको, अशी भूमिका महाविकास आघाडीतील काही नेत्यांची भूमिका असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 28 Dec 2021 11:00 AM (IST)

    Bhagatsingh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बंद लिफाफ्यात पत्र

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बंद लिफाफ्यात पत्र पाठवलं आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रात नेमकं काय आहे, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  • 28 Dec 2021 10:44 AM (IST)

    वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे.

  • 28 Dec 2021 10:43 AM (IST)

    विधान सभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात विकास आघाडीने निर्णय घ्यावा : भास्कर जाधव

    गेल्या 25 वर्षातील राजकारण पाहिलं तर लक्ष्यात येत की प्रत्येक वर्षी कुणाला तरी मारहाण किंवा जीव गमवावा लागतो हे सातत्याने होत आहे

    विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सत्ताधारी पक्षच्या गटनेत्यांनी एकत्र येऊन करायचा आहे.

    मी विधानसभेत सभागृहातील एक सदस्य सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. याबाबाबत आवाज उठवला. त्यांना समज देऊन देखील ते वारंवार टीका करत आहेत. तालिका अध्यक्ष म्ह्णून मी 12 भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना निलंबित केलं होतं.

    विधान सभा अध्यक्ष निवडूकी संदर्भात विकास आघाडीने निर्णय घेतला पाहिजे

  • 28 Dec 2021 10:41 AM (IST)

    राज्यपाल घटना सांगते ते ऐकत नसतील तर ठाकरे सरकारनं दोन हात करण्याची तयारी ठेवावी : भास्कर जाधव

    मी अध्यक्षांचा आदेश मानून आम्ही सभागृहातून बाहेर गेलो. 5 जुलैला मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं. नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन बारा आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलला असता, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा तुमचा राधा सुधा धर्म कुठं केला होता, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.

    राज्यपाल हे केंद्राचे किंवा राज्याचे नोकर नाहीत. राज्यघटनेच्या कलम 178 नुसार संविधानिक शपथ घेतलेली असते. भारतीय संविधान सांगतं त्या प्रमाण राज्य ऐकत नसतील तर महाराष्ट्र राज्य सरकारनं दोन दोन हात करायची तयारी ठेवावी लागेल, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

  • 28 Dec 2021 10:34 AM (IST)

    राज्यपाल आडमुडेपणाची भूमिका घेतायेत,ते कर्तव्यांना अधिकार समजतायेत : असीम सरोदे

    राज्यपाल आडमुडेपणाची भूमिका घेतायेत

    त्यांना कर्तव्य आणि अधिकार यातला फरक समजून घेण्याची गरज आहे ते कर्तव्यांना अधिकार समजतायेत

    त्यातून महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष निर्माण झालाय

    विधानसभा ही सार्वभौम आहे त्यामध्ये न्यायालयही दखल अंदाज करू शकत नाही

    त्यामुळे राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीला मंजूरी द्यावी

  • 28 Dec 2021 10:13 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना

    महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. आज अध्यक्ष पदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय

  • 28 Dec 2021 10:00 AM (IST)

    Sanjay Raut : राज्यपालांनी अभ्यास करु नये: संजय राऊत

    मुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे जे उत्तर पाठवलंय ते समोर आहे. मी कालही म्हणालो राज्यपालांनी अभ्यास करु नये. घटनेत जे अधिकार आहेत त्याप्रमाण त्यांनी काम करावं. घटनेचे नियम, सभागृहाचे हक्क, महाराष्ट्राच्या सरकारचे निर्णय, लोकभावना याच्या विरोधात जाऊन राज्यपालांनी काम करु नये. राजभवनात विद्वत्तेचं अजीर्ण होतंय, असं संजय राऊत म्हणाले .

    मुख्यमंत्री जिथं आहेत तिथून ते काम करत आहेत. सरकारच्या कामाचं नियंत्रण करत आहेत.

  • 28 Dec 2021 09:28 AM (IST)

    Balasaheb Thorat : आम्ही जे केलं ते कायदेशीर केलं, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य

    राज्यपाल आणि आमच्यात संघर्ष आहे  असं म्हणता येणार नाही. आम्ही जे केलेय ते कायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होईल. आम्ही कायद्यानं नियम केलेले आहेत. जे लोकसभेत आहेत ते विधानसभेत केलेत, देशातील इतर सभागृहात ते नियम केलेत. कोणी कोर्टात गेलं तर आम्ही आमची बाजू मांडू असं बाळासाहेब थोरात म्हणाले. आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही, तिन्ही पक्ष चर्चा करुन निर्णय घेऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 28 Dec 2021 09:22 AM (IST)

    राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा, विधानसभा सार्वभौम : दिलीप वळसे पाटील

    मी 30 ते 32 वर्ष सभागृहात आहे. त्या अनुभवाच्या  जोरावर सांगू शकतो की सभागृह सार्वभौम आहे. सभागृहातील सर्व अधिकार अध्यक्षांचे आहेत. राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. विधानसभेला जो निर्णय घ्यायचाय तो विधानसभा घेईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Published On - Dec 28,2021 8:50 AM

Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.