“मी शपथ घेतो की…”, विधानपरिषदेतील नवनिर्वाचित 11 उमेदवारांनी घेतली शपथ

आज 11 वाजता विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या विजयी उमेदवारांना शपथ दिली

मी शपथ घेतो की..., विधानपरिषदेतील नवनिर्वाचित 11 उमेदवारांनी घेतली शपथ
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 11:23 AM

Maharashtra MLC Oath Taking Ceremony : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीने महाविकासआघाडीला धोबीपछाड दिली. विधानसभेत 11 जागांसाठी उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. तर इतर 11 उमेदवार हे विजयी झाले. आता विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. आज 11 वाजता विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या विजयी उमेदवारांना शपथ दिली.

कोणकोणते आमदार घेणार शपथ?

  • पंकजा मुंडे – भाजप
  • योगेश टिळेकर – भाजप
  • अमित गोरखे – भाजप
  • परिणय फुके – भाजप
  • सदाभाऊ खोत – भाजप
  • भावना गवळी – शिंदे शिवसेना
  • कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
  • शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • प्रज्ञा सातव – काँग्रेस
  • 11- मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष

12 जुलैला पार पडलेले मतदान

दरम्यान विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी 12 जुलै रोजी मतदान पार पडले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उभे होते. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात होता.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून आले होते.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.