मुंबई: उत्तर भारतातील हवामानाच्या स्थितीमुळं राज्यात थंडीचं (Cold Wave) वातावरण आहे. मुंबई, (Mumbai) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट पसरलीय. मुंबईत आजही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळतेय. मुंबईत पारा 19 अंशावर पोहोचला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा 4.6 वर पोहोचला आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात चौथ्या दिवशी थंडीची लाट कायम आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमान 5 अंश सेल्सिअस खाली आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. अकोला जिल्ह्यात तापमान 10 अंशाच्या खाली आलेलं आहे. हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडींचं वातावरण कायम राहणार आहे. धुळ्याचा पारा घसरला तापमान 2.8 सेल्सिअस वर पोहोचला आहे.धुळे शहर गारठले असून 10 वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसून आहेत.
धुळ्याचा पारा घसरला तापमान 2.8 सेल्सिअस वर पोहोचला आहे.धुळे शहर गारठले असून 10 वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसून आहेत. सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झालीय. धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून तिचा परिणाम जनजीवनावर होत आसल्याने चित्र पाहण्यास मिळत आहे. थंडी पासून बचावासाठी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. ग्रामीण भागात या थंडीचा शेतीवर देखील परिणाम पाहायला मिळाला भाजीपाला असतील किंवा इतर कडधान्य शेती उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आडचानीत आले आहे. अजून काही दिवस थंडीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे
नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी 4.6 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झालीय. कुंदेवादी येथील गहु संशोधन केंद्रातील हवामान विभागात ही नोंद झालीय. अकोल्यात तापमानाचा पारा घसरला असून तापमान 9 अंश सेल्सियसवर गेलं आहे. कालचे तापमान 10.06 अंश सेल्सियस होते .
सातपुड्याच्या डोंगराळ भागात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून तापमान 4 अंशावर पोहोचलं आहे. तिचा परिणाम जनजीवनावर होत असल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे. थंडी पासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.त्याच प्रमाणे सपाटी भागात तापमान 8 अंशाच्या जवळपास असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आडचानीत आले आहेत. पपई आणि केळी पिकावर थंडीचा परिणाम होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी पॉलिथिनचे आवरण फळावर घातले आहे.अजून तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईत थंडीचा जोर आजही कायम आहे, शहरातील तापमान 19 अंश सेल्सियस इतकं नोंद झालंय. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत धूरकट वातावरण आहे, आजही ते कायम आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 वर पोहोचलाय. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी थंडीची लाट येणार आहे. तापमान 8 अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. त्यामुळे या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Weather Cold Wave Dhule record lowest temperature Nandurbar Nashik Akola and Mumbai also witness cold