Weather Alert : पुढचे 3 दिवस राज्यासाठी धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून इशारा

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरती चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आस्मानी संकट असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Weather Alert : पुढचे 3 दिवस राज्यासाठी धोक्याचे, 'या' जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून इशारा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 9:21 AM

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरती चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आस्मानी संकट असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. (maharashtra weather report Marathwada and Vidarbha have been warned of rain for the next three days)

अधिक माहितीनुसार, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 17 आणि 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या मालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

दरम्यान, आज मध्यरात्रीपासूनच वर्धा जिल्ह्याच्या काही भागात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, सेलू तालुक्यासह कारंजा तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री बरसल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

गारपिटीची शक्यता, शेजकऱ्यांना बसणार फटका

मध्यरात्री काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह पाऊस झाल्याने काही वेळ ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसाने चना पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने मंगळवारी इशारा देत बुधवारी म्हणजेच आज पूर्ण विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?

हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्ये गारपिटीची शक्यता देखील अधिक राहणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या दिवशी औरंगाबाद, खानदेश आणि पश्चिम-महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाची फार शक्यता नसणार.

18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. (maharashtra weather report Marathwada and Vidarbha have been warned of rain for the next three days)

संबंधित बातम्या –

Weather Alert : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather Alert : फेब्रुवारीच्या ‘या’ तारखांना राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा

(maharashtra weather report Marathwada and Vidarbha have been warned of rain for the next three days)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.