Weather Report Today : राज्यातभरात संततधार, औरंगाबादेत पाझर तलाव फुटला, चाळीसगावात पूर, 3-4 दिवस पाऊस कोसळणार
राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी (30 ऑगस्ट) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तर सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी (30 ऑगस्ट) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तर सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. या पावसाने औरंगाबादमध्ये पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीय, तर चाळीसगावात पूर आलाय.
मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?
Latest satellite & radar imageries indicate convection over most parts of interior Maharashtra.Moderate to intense spell of rain very likely to occur in districts of Pune,Jalgaon Ahmednagar,Solapur,Aurangabad,Jalna,Latur,Osmanabad,Nanded,Jalna, Parbhani,Beed during next 3-4hrs pic.twitter.com/7loClVVhAr
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 30, 2021
मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
३० ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,१५° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यासाठी IMD ने खालील प्रमाणे इशारे पुढच्या ३,४दिवसासाठी दिलेले आहेत.काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे,उत्तर कोकणात पण @RMC_Mumbai pic.twitter.com/e8tHRpwd6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”
कन्नड घाटात दरड कोसळली
चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.
औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस
औरंगाबादमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार समोर आला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता . दरवाजा बंद झाल्यानंतर स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढले. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनीच हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
चाळीसगाव-कन्नड भागात ढगफुटी
जळगावातील चाळीसगाव आणि औरंगाबादेतील कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. तर कन्नड चाळीसगाव घाटात कोसळली दरड. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा तुटला संपर्क
बीडला पावसाने झोडपलं
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
Aurangabad Weather: शहरात पावसाचा शिडकावा, वातावरणात गारवा, पुढचे 3 दिवस मध्यम पावसाचा अंदाज
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?
Weather Update: ‘पुढचे 5 दिवस नो हवामानाचे इशारे’, IMD चा नवा ॲलर्ट
व्हिडीओ पाहा :
Maharashtra Weather report today 31 August 2021 Rain updates