पुणे साताऱ्यात मुसळधार, तळकोकणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर प्रभाव कायम आहे. आजपासून पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तसंच ताशी ४० किमी वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. तळ कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई : राजधानी मुंबईसह राज्याच्या बऱ्याचश्या भागांत बुधवारी मुसळधार पाऊस पडला. असाच पाऊस पुढचे 3 दिवस कायम राहण्याच्या राहण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुणे, साताऱ्यासह कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर प्रभाव कायम आहे. आजपासून पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तसंच ताशी ४० किमी वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. तळ कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तळकोकणातील तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हांसह कोकणात पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आजही पावसाचा इशारा
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत उद्यापर्यंत (8 सप्टेंबर) काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुण्यात सोमवारी-मंगळवारी जोरदार पाऊस
पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.
अतिमुसळधार पावसाने पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली
शहरात सोमवारी संध्याकाळी अतिमुसळधार पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. पुणे शहरालगतच्या आकाशात 12 ते 15 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. त्यामुळे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं, प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला होता. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा अशी सूचनाही पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली होती.
(Maharashtra Weather Update Pune Satara Kolhapur yellow alert By IMD)
पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह?? जोरदार पावसाची शक्यता. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते. IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021
हे ही वाचा :
Weather Alert: राज्यासाठी पुढील चार दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता