ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र

Maharashtra winter session : कोरोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान आता 22 ते 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती मिळालीय.

ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र
महाराष्ट्र विधानसभा
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 5:36 PM

मुंबईः राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होणार असल्याची चर्चा होती. पण ठाकरे सरकारनं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचं नियोजन केल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळतेय. तसेच विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असून, सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे, त्यातच या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जातंय.

आता 22 ते 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार

कोरोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान आता 22 ते 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती मिळालीय. हिवाळी अधिवेशन हे प्रथा आणि परंपरेनुसार दरवर्षी नागपूरला होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव ते मुंबईत घेण्याचे नियोजन आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही अधिवेशन मुंबईत हवे आहे, पण भाजप हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.

विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही

यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेय. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.

डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य

तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली होती.

संबंधित बातम्या

तिकीट कापायचा पॅटर्न ठरला; फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली!

विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकीचे इंधन महाग, काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? : राऊत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.