राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागलेत. नागपूर आणि नंदूरबारमध्ये जनतेने काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. तर धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजप उमेदवार पंकज कोरे खासदार पुत्र रोहित गावित यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले. तर वाशिममध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी बाजी मारत प्रतिष्ठेची जि.प राखली.
? धुळे – 15 (भाजप 8, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, इतर 0)
? नंदूरबार – 11 (भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस, 3 इतर 0)
? अकोला – 14 (14 भाजप 1 शिवसेना 1 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 1 वंचित 9)
? वाशिम -14 (भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 2, इतर 4 )
? नागपूर -16 (भाजप 3, शिवसेना 0, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, इतर 2)
? पालघर-15 (भाजप 5, शिवसेना 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 0 इतर 1)
राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागलेत. नागपूर आणि नंदूरबारमध्ये जनतेने काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. तर धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला परंतु असं असलं तरी सत्तेचा मार्ग मात्र खडतर असणार आहे. अकोल्यातल्या सत्तेच्या चाव्या भाजप आणि अपक्षांच्या हाती असणार आहे. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजप उमेदवार पंकज कोरे खासदार पुत्र रोहित गावित यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले. तर वाशिममध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी बाजी मारत प्रतिष्ठेची जि.प राखली.
शिवसेनेला 5 जागा, जिल्हा परिषदेत 2 जागा वाढल्या
राष्ट्रवादीला 5 जागा, 3 जागा कमी झाल्या
भाजपला 5 जागा, 1 जागा वाढली, माकपची 1 जागा कायम
खासदार राजेंद्र गावित यांचा पुत्र रोहित गावित जि.प. निवडणुकीत पराभूत
मनसे भाजप युतीला अपयश, सेनेला फायदा
नागपुरात 16 पैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या, 2 जागा वाढल्या
राष्ट्रवादीला 2 जागांचा तोटा, दोन्ही जागा गमावल्या
भाजपला 3 जागा, गेल्या वेळीच्या तुलनेत 1 जागा कमी झाली
शेकाप आणि इतर पक्षाला प्रत्येकी 1 जागा
काँग्रेसची सत्ता कायम राहणार, मंत्री सुनील केदार यांचं वर्चस्व कायम
अकोला झेडपी पोट निवडणुकीत वंचितने 6 जागा कायम राखल्या
वंचित समर्थक दोन सदस्य होते, समर्थक एकमेव सदस्य
भाजपच्या दोन जागा कमी झाल्या, राष्ट्रवादीची 1 जागा वाढली
झेडपीत आता वंचित आणि महाविकास आघाडीतील पक्षांना समसमान 22 जागा
अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती
धुळे झेडपीत भाजपची सत्ता कायम राहणार, पण 3 जागा कमी झाल्या
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा 3 जागांचा फायदा
काँग्रेस शिवसेनेने आपापल्या जागा राखल्या
भाजप आमदार अमरीश पटेल यांचं शिरपूरमध्ये वर्चस्व कायम
गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी
नंदुरबार झेडपीमध्ये भाजपने 3 जागा गमावल्या, 4 जागांवर विजय
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एका जागेचा फायदा
नंदुरबार पंचायत समिती शिवसेनेने भाजपकडून हिसकावली
शहादा पंचायत समिती भाजपने गमावली, आता काँग्रेसची सत्ता
कोळदा गटातून आमदार विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित विजयी
कोपर्ली गटातून आमदार विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांचा पराभव
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांचयाकडून पंकज यांचा गावित यांचा पराभव
खापर गटातून मंत्री के.सी. पाडवी यांची बहीण गीता पाडवी विजयी
गीता पाडवी यांच्याकडून माजी मंत्री दीलवीर सिंग पाडवी यांचा मुलगा नागेशचा पराभव
वाशिम जिल्हा परिषद मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसेल
काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना आणि वंचित चारही पक्षांना पुन्हा एकदा सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार
सर्व पक्षाशी बोलणे झाले आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढलो
पुन्हा महाविकास आघाडी म्हणून सोबत येणार
महाविकास आघाडीचा वाशिम मध्ये वेगळा पॅटर्न
वंचीत बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असल्याचं चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.
धुळे जिल्हा परिषद निकाल एकूण 15 जागा, 14 जागांची मतमोजणी पूर्ण –
भाजप 8
लामकाणी – धरती देवरे विजयी
फागणे – अश्विनी पवार विजयी
कुसुम्बा – संग्राम पाटील विजयी
नगाव – राम भदाणे विजयी
मालपूर – महावीरसिंग रावळ विजयी
खलाणे – सोनी कदम विजयी
नरडाना – संजीवनी सरोदे विजयी
शिरूड – आशुतोष पाटील विजयी
राष्ट्रवादी 3
कापडणे – किरण पाटील विजयी
मुकटी – मीनल पाटील विजयी
बेटावद – ललीत वारुडे विजयी
शिवसेना 1
बोरकुंड – शालिनी भदाणे विजयी (बिनविरोध)
काँग्रेस 2
नेर – आनंदा पाटील विजयी
बोरविहिर – मोतनबाई पाटील विजयी
धुळ्याच्या शिरुड गटात भाजपचा उमेदवार विजय
शिरुड गटात भाजपाचे आशुतोष पाटील विजयी
बहुजन विकास आघाडीने खातं उघडलं
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा विजय
शिगाव गणातून बविआचे अनिल कात्या विजयी
वाशिम राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा जि.प निवडणुकीत विजय,
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची जागा राखली
राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये काँटे की टक्कर
वंचितच्या सुभाष राठोड यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी
अल्पशा मताने सुभाष राठोड पराभव
धुळ्याच्या साक्रीत शिवसेनेला चांगलं यश,
3 गणांमधून 3 उमेदवार विजयी
शिवसेनेचा आनंद पोटात माईना
वाशिम जिल्हा परिषदेची प्रतिष्ठेची जागा राखण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले आहे.
चंद्रकांत ठाकरे यांचा विजय झालेला आहे
चंद्रकांत ठाकरेंचा 342 मतांनी विजय
चंद्रकांत ठाकरे माजी मंत्री सुभाष ठाकरेंचे पुत्र
नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा धक्का
4 जागांपैकी 2 जागांवर भाजप तर एका जागेवर शेकापचा विजय
भाजप कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
अकोल्यातील सर्व जागांचे निकाल हाती, वंचितची सत्ता अबाधित
वंचित 6 जागा, राष्ट्रवादी 2 जागा आणि शिवसेनेला 1 जागा
नंदूरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांवरील सदस्यांच्य सदस्यत्व रद्द झालं होतं. त्यामध्ये भाजपच्या 7 सदस्यांना फटका बसला होता. पोटनिवडणुकीत भाजपनं 4 जागा गमावल्या आहेत. आता त्यांच्या 3 जागा निवडून आल्या आहेत.
पालघर पंचायत समितीत मनसेने खाते उघडले,
मनसेच्या तृप्ती पाटील विजयी
नंदूरबार जिल्हा परिषद
भाजप-04
शिवसेना-03
राष्ट्रवादी-01
काँग्रेस-03
इतर-00
नंदूरबार पंचायत समिती
भाजप-02
शिवसेना-01
राष्ट्रवादी-01
काँग्रेस-03
इतर-00
शहादा तालुक्यातील जावदे तबो गणातून काँग्रेसच्या निमा पटले 198 मतांनी विजयी
सूलतानपूर गणातून काँग्रेसच्या वैशाली पाटील 1353 मतांनी विजयी
शहादा तालुक्यातील खेडदिगर गणातून काँग्रेसच्या संगिता पाटील 735 मतांनी विजयी
अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील कुटासा गटातून स्फूर्ती निखिल गावंडे विजयी
बच्चू कडूंच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एंट्री
आमदार अमोल मिटकरींचा गावातच पराभव, राष्ट्रवादीला धक्का
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.
कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे.
भाजपच्या पंकज कोरे यांनी विजय मिळवला आहे.
नंदुरबार- भाजपाच्या ऐश्वर्यादेवी जयपालसिंग विजयी
शहादा तालुक्यातल्या कहाटूळ गटात भाजपाच्या जयपालसिंग ह्या ४५८ मतांनी विजयी.
त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
नगाव गटातून भाजपचे राम भदाणे विजयी
नगाव गटातून भाजपचे राम भदाणे 1524 मतांनी विजयी
रणाडा गटातून शिवसेनेच्या शकुंतला शिंदे विजयी
रणाडा गटातून शिवसेना विजयी,
शकुंतला शिंत्रे विजयी, 1373 मतांनी विजयी
भाजपच्या रिना पांडुरंग पाटील यांचा केला पराभव
भाजपला नंदुरबारमध्ये आणखी एक धक्का
महाविकास आघाडीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता एकहाती कायम
शिंदखेडा गटाच्या 3 जागा भाजपच्या ताब्यात तर 1 राष्ट्रवादीकडे
पंचायत समितीच्या 4 जागी भाजप तर एका जागेवर राष्ट्रवादी विजयी
आतापर्यंत
धुळे जिल्हा परिषद गट निकाल
5 भाजप
1 राष्ट्रवादी
1 शिवसेना
गण
12 भाजप
1 राष्ट्रवादी
सुभाष ठाकरेंचे चिरंजीव चंद्रकांत ठाकरे आणि सुभाष राठोड यांच्यात काँटे की टक्कर
आसेगाव सर्कल मध्ये काट्याची लढत
चंद्रकांत ठाकरे राष्ट्रवादी- 3585
सुभाष राठोड- 3260
चंद्रकांत ठाकरे 325 मतांनी आघाडीवर
शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून शिवसेनेकडून विजयी झाले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांचा राम रघुवंशी यांनी पराभव केला. राम रघुवंशी 3002 मतांनी विजयी
राष्ट्रवादी चंद्रकांत ठाकरे- 2659 (468 मतांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पिछाडीवर)
वंचित सुभाष राठोड 3127
आसेगाव सर्कल 12 वा राऊंड
पालघर जिल्हा परिषद उधवा गटातून माकप उमेदवार अक्षय दवणेकर विजयी
उधवा गटात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व कायम
2020 मध्येही अक्षय दवणेकर होते विजयी उमेदवार
धुळे- मतमोजणी केंद्रावर पाकिटमाराला पकडलं
जमलेल्या गर्दीत हात सफाई करतांना लोकांनी पकडलं रंगेहाथ
मोठा गोंधळ आणी मारामारी
आक्रमक गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी, पोलिसांनी केला लाठीचार्ज
परिस्थिती नियंत्रणात
संशयीत पोलिसांच्या ताब्यात
भाजपा खासदार हिना गावितांची आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींवर टिका
सगळे मतदार संघ सगळी ताकद खापर जिल्हा परिषद गटात लावली
म्हणून त्यांची बहिण विजयी झाली
खापर जिल्हा परिषद गटात भाजपा जिल्हाध्यक्षांचा गीता पाडवींनी केला पराभव
खापर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा झेंडा
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींची बहिण गीता पाडवी विजयी
नंदुरबार पंचायत समितीत भाजपच्या उमेदवार विजयी
भाजपच्या सीमा मराठे होळतर्फे हवेली गणातून विजयी
वाशीम- कारंजा तालुक्यातील भामदेवी सर्कल भारिपच्या वैशाली लड़े विजयी- 3430 मते
पंचायत समिती – भारिपचे किशोर ढाकूलकर विजयी- 1592 मते
कोंडामळी जिल्हा परिषद गटात भाजपचे शांताराम पाटील विजयी
नंदुरबार दोन जिल्हा परिषद गटावर भाजपचा झेंडा
अवघ्या 86 मतांनी विजयी
सीमाबाई जगन्नाथ मराठे कोळदा पंचायत समिती गणातून विजयी,
कोळदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीही भाजपकडे
-नंदुरबार लोणखेडा गटातून भाजपचा विजय,
-जयश्री पाटील 4204 मतांनी विजयी
-अकोल्यात घुसरमधून वंचितची बाजी
-शंकर इंगळे 3904 मतांनी विजयी
धुळे जिल्हा परिषदेचे पहिले दोन निकाल हाती
लामकानी गटातून भाजपाच्या धरती देवरे तर कापडणे गटातून राष्ट्रवादीचे किरण पाटील विजयी
नगरखेडा पंचायत समिती भाजपच्या ताब्यात
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का
राष्ट्रवाजीच्या ताब्यातून भाजपने नगरपालिका हिसकावली
नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार,
वेळ आली की सांगू जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार
भाजपचे माजी मंत्री विजयकुमार गावितांचं मोठं वक्तव्य,
नंदूरबारच्या लोणखेडा गटातून भाजपाच्या जयश्री पाटील 4204 मतांनी विजयी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांची बहीण गीता पाडवी खापर गटातून विजयी झाल्या आहेत.
धुळे – शिरपूर चे 6 गण भाजपाच्या ताब्यात
6 पैकी 6 गण भाजपच्या ताब्यात
अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम
नंदुरबार जि.प. भाजपच्या सुप्रिया गावित विजयी
सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या भगिनी
नागपूर- बेनोला पंचायत समितीमध्ये भाजपच्या हेमलता सातपुते विजयी
नागपूर पंचायत समिती काँग्रेसच्या मालती वसू विजयी
अक्कलकुवा जि.प. काँग्रेसच्या रेहणाबेन मक्रणी विजयी
-नागपूर उमरेड पंचायत समितीत भाजपच्या उमेदवार विजयी
-मिनाक्षी कावटे 113 मतांनी विजयी
अकोला पंचायत समिती तेल्हारा गणातून वंचितचा उमेदवार विजयी
वंचितचे अरविंद तिवाने विजयी
अकोला पंचायत समितीत वंचितने खातं उघडलं
हिवरखेड गणातून अब्दुल आदिल विजयी
पालघर जि.प. शिवसेनेच्या विनया पाटील विजयी
भाजपच्या धरती देवरे लामकाने गटातून विजयी
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी
शिवसेनेच्या मिनाबाई पाटील यांचा केला पराभव
भाजपला आता बहुमतासाठी फक्त एका जागेची आवश्यकता
नंदूरबारच्या कोळदा गटातून भाजपच्या सुप्रिया गावित विजयी
शिवसेनेच्या आशा पवार पराभूत
सुप्रिया पवार या खासदार हिना गावित यांच्या भगिनी
नंदूरबार जि.प. काँग्रेसच्या उमेदवार हेमलता शितोळे विजयी
नंदुरबार: कोलदा गटातून भाजपच्या सुप्रिया गवित 10०० मतांनी पहिल्या फेरीत आघडीवर.
विजयकुमार गावितांची मुलगी
पहिल्या फेरीत शिवसेनेच्या आशा पवार पिछाडीवर
देवलामेटी गणातून भाजपच्या ममता जैस्वाल विजयी
1203 मतांनी ममता जैस्वाल यांची बाजी
लामकने गटातून भाजपच्या धरती देवरे आघाडीवर.
धरती देवरे या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या
पंचायत समितीचा पहिला निकाल हाती
अकोल्यात शिवसेनेने हंडी फोडली
दहीहंडा गणातून सेनेची बाजी
पंचायत समिती मतमोजणी सुरू
मतमोजणीचा पहिला राउंड संपला
काही क्षणात येणार पंचायत समिती कल
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मतमोजणीला सुरुवात झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 11 गट आणि पंचायत समिती 14 गणांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे
नागपूर जिल्हयात सुरुवातीला पंचायत समितीची मतमोजणी होणार
– जिल्ह्यातील ३१ पंचायत समितीची मतमोजणी आधी होणार
– पंचायत समिती मतमोजणी झाल्यावर होणार जिल्हा परिषद निवडणूकीची मतमोजणी
– १० वाजता होणार सुरुवात
वाशिम जिल्ह्यातील 14 जिल्हा परिषदेसाठी तर पंचायत समितीच्या 27 गणा करिता काल मतदान प्रक्रिया पार पडली असून या मध्ये 193 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्याचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. काल 3 लाख 51 हजार 257 मतदार पैकी 2 लाख 22 हजार 871 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात 63.45 टक्के मतदान झाले असून आज सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच मतदार राजाने नेमका कौल कोणाला देईल याचे चित्र 10 च्या नंतर स्पष्ट होणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. यामध्ये काँग्रेसने 14 पैकी 9 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11 आणि शिवसेनेने 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. या पोटनिवडणुकीमध्ये वंचित आणि जनविकास आघाडीची युती झाली असून वंचित ने 12 तर जनविकास आघाडीने 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपाचे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काल पार पडलेल्या मतदानात मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपल्या मताचं दान टाकलं हे, आज 10 वाजता समजेल.
पुणे
पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 12 हजार 27 विद्यार्थ्यांनी दिली लेखी परीक्षा
यासाठी 39 हजार 323 उमेदवारांनी केले होते अर्ज
79 केंद्रावर पार पडलेल्या या परिक्षेला केवळ 12 हजार 27 विद्यार्थीच होते उपस्थित
नंदूरबारच्या जि.प 11 जागा, पंचायत समिती 14 जागांचा निकाल, आज मतमोजणी
-विजयकुमार गावितांची मुलगी मैदानात सुप्रिया गावित विरुद्ध अशा समीर पवार शिवसेना
भाजपा विरुद्ध शिवसेना असा थेट सामना
-खापर गटात गीता कागडा विरुद्ध नागेश पाडवी भाजपचे माजी मंत्री यांचा मुलगा
खापर गटात भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना,
-तर कोपार्ली गटात राम रघूवंशी (शिवसेना) vs पंकज गावित (भाजपा)
शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट सामना
धुळ्यात 14 गट व 28 गणांचा निकाल लागतोय. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपशी सत्ता होती. एकूण 56 जिल्हापरिषद जागांपैकी भाजपकडे सध्या 27 जागा आहेत. शिवसेना 2,राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 6 जागा आहेत.
बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपच्या उमेदवार तथा गुजरात राज्याच्या भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या सुकन्या धरती देवरे त्यांनी व्यक्त केला आहे.
1) काटा गटात शिवसेनेचे अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे यांच्या पत्नी ललिता खानझोडे उभ्या असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका देशमुख ,व काँग्रेस कडून संध्याताई देशमुख या उभ्या असून या उमेद्वारात थेट लढत होणार आहे.
माजी सभापती विजय खांनजोडे यांना मागील निवडणूक 1000 मतांनी विजयी झाले होते…
2) पार्डी टकमोर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे राजू चौधरी तर अपक्ष सरस्वती चौधरी यांच्यामध्ये लढत होणार आहे.
काँग्रेसचे राजू चौधरी माजी 2010 च्या दरम्याच्या जी प अध्यक्ष याचे देर असून त्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे…
3) उकळी पेन गटामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी आणि वंचित चे दत्ता गोटे यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांची प्रतिष्ठा पणाला आहे…
4 ) आसेगाव सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची वंचितचे सुभाष राठोड यांच्यामध्ये चुरसीची लढत होणार आहे.
त्यामुळं या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत ठाकरे आताचे जी प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष हे मागील निवडणूक मध्ये 1400 मताने निवडून आले होते मात्र यावेळी काट्याची लढत असून त्याची प्रतिष्ठा पणाला आहे..
5) तळप बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे यांची काँग्रेसच्या रजनी गावंडे यांच्यात थेट लढत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या शोभा गावंडे ह्या 600 मतांनी निवडणून आल्या होत्या त्याची या निवडूनक प्रतिष्ठा पणाला लागली आहे..
6) गोभणी सर्कलमध्ये बेबीताई ठाकरे शिवसेना ,रेखा उगले काँग्रेस,पूजा भुतेकर जनविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे…
आमदार अमित झनक याच्या जवळच्या रेखा उगले याची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला आहे..