Mahashivratri 2021 | त्र्यंबकेश्वर, औंढा-नागनाथ ते भीमाशंकर, महाशिवरात्रीलाही मंदिरं भाविकांसाठी बंद

आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण आहे. या दिवशीच महादेव (Mahadev) आणि माता पार्वती (Mahashivratri 2021 Temple Closed ) यांचे लग्न झाले होते, असे पुराणात म्हटले जाते.

Mahashivratri 2021 | त्र्यंबकेश्वर, औंढा-नागनाथ ते भीमाशंकर, महाशिवरात्रीलाही मंदिरं भाविकांसाठी बंद
Shiv Mandir
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 7:59 AM

मुंबई : आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण आहे. या दिवशीच महादेव (Mahadev) आणि माता पार्वती (Mahashivratri 2021 Temple Closed ) यांचे लग्न झाले होते, असे पुराणात म्हटले जाते. म्हणून, महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधिनुसार व्रत करतो, त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सांगितले जाते (Mahashivratri 2021 Temple Closed For Devotees Due To Corona Virus).

मात्र, इतर सर्व सणांप्रमाणे कोरोनामुळे महाशिवरात्रीचा सणही साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यातील रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करत या वर्षी महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन गृह विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील महत्त्वाची सर्व शिव मंदिरं आज भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

महाशिवरात्री

महाशिवरात्री

बाबूलनाथ मंदिर भाविकांसाठी बंद, ऑनलाईन दर्शनाची सुविधा

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी बाबूलनाथ मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रबंधक यांनी घेतलेले आहेत. मंदिर 10 मार्च सकाळी 7.30 ते 12 मार्च सकाळी 7.30 वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री बाबूलनाथ मंदिर प्रबंधकने भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिले आहेत. बाबूलनाथ मंदिर मुंबईतील मालाबारहिल या परिसरात आहे दर वर्षीय मोठे संख्येनी भाविक भोळेनाथच्या दर्शनासाठी येत असतात परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने मंदिर बंद असल्याने भाविकांच्या मनात निराशा पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून मंदिरच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या कडक बंदोबस्त ठेवण्यात आली आहे..

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा शुकशुकाट

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा भाविकांना प्रवेश नसल्यानं मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात किमान 4 ते 5 लाख भाविक भगवान महादेवाचं दर्शन घेत असतात.

अंबरनाथ शिव मंदीर

अंबरनाथ शिव मंदीर

मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना वाढू लागल्यानं महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काल रात्री 12 वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मंदिरात प्रथेप्रमाणे आरती केली. यानंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आलं. हे शिवमंदिर तब्बल 961 वर्ष जुनं असून इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर भाविकांविना ओस पडलंय. त्यामुळे यंदा चुकल्या चुकल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया मंदिराचे पुजारी रवी पाटील यांनी दिली. तर भाविकांनी शिवमंदिर परिसरात येऊ नये, असं आवाहन अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी केलं.

भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्री भक्तांविना

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. मात्र, ही महाशिवरात्री भक्तांविना साजरी होत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून रोज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा सोहळा साजरा होत आहे. हा सोहळा साजरा होत असताना मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाईने नाहून निघाले आहे. तसेच, शिव मंदिराच्या गाभाऱ्यात सुरेख अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.

भीमाशंकर मंदीर

भीमाशंकर मंदीर

अकोल्यातील आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर महाशिवरात्रीला खुले

अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर महाशिवरात्रीला सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असून, मास्क आवश्यक, सोशल डिस्टस आवश्यक असून एका वेळी 50 भाविकांचा जथ्था एकावेळी सोडणार आहे.

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरावर खास लेझर शो

नाशकातील लेझर शोने त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर उजळून निघालं आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिरावर खास लेझर शो करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास मंदिरावर लेझर शोचा झगमगाट करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून यंदा भाविकांना मात्र मंदिरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा महाशिवरात्री सोहळा पार पडणार आहे.

औंढा-नागनाथ येथील नागनाथाचं मंदीर बंद

औंढा नागनाथ मंदीर

औंढा नागनाथ मंदीर

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त मोठी यात्रा भरते जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यात्रा रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त मोठी यात्रा असते महादेव-पार्वतीची वरात रथामधून काढली जाते. रथ उत्सव कार्यक्रम यात्रेतील प्रमुख आकर्षण असून नागनाथ मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात दर वर्षी सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आलीये. रात्री साडे बारा वाजता देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते पूजा झाली. कोरोना मुळे पूजे नंतर महाशिरात्रीच्या रात्री इतिहासात पहिल्यांदा मंदिर बंद करण्यात आले कोरोणाच संकट लवकर जाव म्हणू विश्वस्त व पुजारी कृष्णा ऋषी यांनी नागनाथाला साकडे घातले.

शहापुरातही देऊळ बंद

शहापूर मधील गंगा देवस्थान येथील महाशिवरात्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मंदिरामध्ये यावर्षी भाविकांना परवानगी नाही.

शहापूर तालुक्यातील सर्वात मोठी महाशिवरात्री गंगा देवस्थान, वाफे येथे भरत असते. येथे लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि हजारोच्या संख्येने छोटे-मोठे व्यापारी, खेळणे, पाळणे, गृहउपयोगी वस्तू, यांच्यासह अनेक व्यापारी आपली दुकाने लावत असतात. त्यामुळे एका दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात सर्वात मोठी समजली जाणारी गंगादेवस्थान, वाफे येथील महाशिवरात्री मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव मंदिरात साधेपणाने होणार आहे. मोजकेच ग्रामस्थ आणि मंदिराचे ट्रस्टी आणि पदाधिकारी यांच्या हस्ते महाअभिषेक आणि महापूजा होणार आहे

इचलकरंजीतही शिव मंदिरं बंद

इचलकरंजी शहरात महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील सर्व महादेव मंदिर बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व महादेव मंदिरे बंद राहणार आहेत. शहरातील महादेव मंदिरासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी मंदिरामध्ये येऊ नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे (Mahashivratri 2021 Temple Closed For Devotees Due To Corona Virus).

नागपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी

नागपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी घालण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मंदिरात होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने हे आवाहन केलं आहे. नागरिकांनी घरीच उत्सव साजरा करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. मंदिरात गर्दी होणार नाही, याकडे प्रशासनाचं लक्ष आहे. मंदिरातील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाची भिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

रामेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई

साताऱ्यातील क्षेत्रमाहुली येथे रामेश्वर मंदिरावर महा शिवरात्रीच्या पुर्व संध्येला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांना बंदी असली तरी घरबसल्या शंभु महादेवाचे दर्शन व्हावे यासाठी गावातीलच रामेश्वर मंदिर, क्षेत्रमाहुली ग्रामंपचायत, सरपंच गृप यांनी हा उपक्रम राबविला आहे. हे मंदिर 1703 मध्ये बांधले अजुनही सुस्थितीत आहे. संध्या या मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई डोळ्याचे पारणे फेडत आहे.

Mahashivratri 2021 Temple Closed For Devotees Due To Corona Virus

संबंधित बातम्या :

Mahashivratri 2021 | आर्थिक, कौटुंबिक समस्या सुटतील, नोकरीतही यश लाभेल, महाशिवरात्रीला ‘हे’ उपाय करा

Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र  ‘या’ चुका करणे टाळा!

Mahashivaratri 2021 | नक्षत्रांच्या पंचकादरम्यान साजरी होणार यंदाची महाशिवरात्री, जाणून घ्या काय आहे ‘हा’ मुहूर्त!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.