Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मविआ’च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणार

मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते. 'मविआ'च्या शिल्पकाराने या सुंदर शिल्पावर ओरखडा देखील उमटणार नाही याची काळजी घ्यावी, अशी बोचरी टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

'मविआ'च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणार
छगन भुजबळ आणि संजय राऊत.
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 4:59 PM

नाशिकः मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते. ‘मविआ’च्या शिल्पकाराने या सुंदर शिल्पावर ओरखडा देखील उमटणार नाही याची काळजी घ्यावी, अशी बोचरी टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेचे निमित्त होते नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखा घोषित करण्याचे. मात्र, येथे अपेक्षेप्रमाणे राजकारणाचा विषय निघालाच. यावेळी अतिशय संयत आणि सौम्य भाषेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राऊतांच्या कालच्या भाषणाला चोख प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी काल नांदगावचा नाद करायचा नाही, असे वक्तव्य केले होते. यावर भुजबळ म्हणाले, नांदगावबद्दल राऊत काय बोलले हे माहिती नाही. कुठल्या आवाजात ते बोलतात, त्यावरून अर्थ बदलतात. पाहुणचार देवाणघेवाण होत असते. खरे तर संजय राऊत हे शरद पवारांसारखेच ‘मविआ’चे शिल्पकार. सुंदर शिल्प तयार झाले असेल, तर त्यावर ओरखडा उमटणार नाही याची काळजी खास करून शिल्पकाराने घ्यावी. शिवसेनेत मी वेळी राज्यात शाखा सुरू केल्या. त्यावेळी संजय राऊत नव्हते. सामनाच्या लॉचिंग वेळेचेही फोटो माझ्याकडे आहेत, असे म्हणताच चांगलीच खसकस पिकली.

माझे काम त्यांना माहित नसावे

भुजबळ म्हणाले, शिवसेनेत मी असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो, असं म्हणालो हे मान्य. मात्र, कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत यांनाही काम केल्यानेच सामनाचे संपादक केले. मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा ते खासदार देखील नव्हते. नांदगाव मतदार संघ विसरा असं ते म्हणाले. या बाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलं, ते त्यांना माहीत नसावं. कारण त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी या मतदार संघात परत परत यावे. आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले. त्यांनीही १०० प्लस आमदार निवडून आणण्याचं आवाहन केलंय, अशी आठवणही भुजबळांनी करून दिली.

महाविकास आघाडीचे ज्याप्रमाणे शरद पवार शिल्पकार आहेत. तसेच संजय राऊतही शिल्पकार आहेत. त्यांनी या सुंदर शिल्पाची काळजी घ्यावी. त्यावर ओरखडाही उमटणार नाही हे पाहावे. नांदगाव मतदार संघ विसरा असं ते म्हणाले. या बाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलं, ते त्याना माहीत नसावं. कारण त्यांना गल्लीपासून दिल्ली पर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी या मतदार संघात परत परत यावे.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

इतर बातम्याः

ठरलं! साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच, नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सोहळा!!

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.