TV9 special report: राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची आठ मते फुटली, एमआयएम आणि सपाच्या मतदानाबाबत संशय, आघाडीसोबतचे काही अपक्षही आरोपीच्या पिंजऱ्यात, वाचा सविस्तर

महाविकास आघाडीकडे अपेक्षित संख्याबळ असूनही त्यांना तिसरी जागा जिंकता आली नाही. तर अपेक्षित संख्याबळ नसतानाही भाजपाने त्यांचे तीनही उमेदवार निवडून आणले आहेत. निवडणुकीपूर्वी काय होतं मविआ आणि भाजपाचं गणित, कुणाला प्रत्यक्षात किती मते मिळाली, कुणाची नेमकी मते फुटली, याच्यावर एक नजर.

TV9 special report: राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची आठ मते फुटली, एमआयएम आणि सपाच्या मतदानाबाबत संशय, आघाडीसोबतचे काही अपक्षही आरोपीच्या पिंजऱ्यात, वाचा सविस्तर
जोरदार घोषणाबाजी..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 8:23 PM

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha election)अखेरच्या टप्प्यात खरतंर महाविकास आघाडीचा (MVA)विजय सोपा दिसत होता. महाविकास आघाडीच्या गणिताचा विचार केला तर चारही उमेदवार निडणून येण्याइतपत संख्याबळ मविआकडे कागदोपत्री तरी दिसतं होतं प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी 40.5 चा म्हणजेच 41 आमदारांचा आकडा आवश्यक होता. महाविकास आघाडीकडे अपेक्षित संख्याबळ असूनही त्यांना तिसरी जागा जिंकता आली नाही. तर अपेक्षित संख्याबळ नसतानाही भाजपाने (BJP) त्यांचे तीनही उमेदवार निवडून आणले आहेत. निवडणुकीपूर्वी काय होतं मविआ आणि भाजपाचं गणित, कुणाला प्रत्यक्षात किती मते मिळाली, कुणाची नेमकी मते फुटली, याच्यावर एक नजर..

काय होतं आघाडीचं संख्याबळ?

शिवसेनेचे 55 आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे 53 संख्याबळ आहे. त्यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तरी त्यांचे संख्याबळ 51 होतं. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बेरीज होते 150, त्यासह 15 छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार मविआच्या बैठकीला उपस्थित होते, त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1.शंकरराव गडाख 2.राजेंद्र पाटील येड्रावकर 3.मंजुळा गावित 4.गीता जैन 5.आशिष जयस्वाल 6.किशोर जोरगेवार 7.चंद्रकांत पाटील 8.विनोद अगरवाल,गोंदिया 9. बच्चू कडू 10.राजकुमार पटेल 11.नरेंद्र बोंडेकर 12. विनोद निकोले,माकप 13. संजय मामा 14. शाम शिंदे 15. देवेद्र भुयार ही एकूण संख्या होते 150 अधिक 15 हा आकडा 165 होता. यात सपाच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात मविआला यश आले होते. म्हणजे हा एकूण आकडा 167 पर्यंत गेलेला होता. एमआयएमने निवडणुकीच्या दिवशी मविआला पाठिंबा जाहीर केल्याने हा आकडा झाला होता 169. म्हणजे या सगळ्यात गणितात निवडणुकीपूर्वी आघाडीचं संख्याबळ होतं 169. यात बविआचा समावेश नव्हता.

प्रत्यक्षात आघाडीला किती मते पडली?

प्रत्यक्षात विचार केला तर प्रफुल्ल पटेल यांना 43, काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना 44 तर संजय राऊत यांना 41 मते मिळाली. शिवसेना आमदार सुहार कांदे यांचे एक मत बाद झाले. तर पहिल्या फेरीत शिवसेनेच्या संजय पवार यांना 33 मते मिळाली. या सगळ्यांची बेरीज केली, तर ही मतांची बेरीज जाते 162. तर यातील प्रफुल्ल पटेलांना पडलेले एक मत भाजपाकडचे असल्याचे शरद पवारांनी सांगितले, ते वजा केले तर हा आकडा जातो 161. म्हणजेच महाविकास आघाडीची एकूण 8 मते फुटली.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी सांगितलेली सहा नावे कोणती?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी सहा नावे सांगितली असली, तरी या सगळ्या वरच्या गणितात बहुजन विकास आघाडी नव्हतीच. त्यामुळे ती तीन नावे त्या सहा नावातून वगळली, तरी त्यांनी लोह्याचे अपक्ष आमदार श्याम शिंदे, माळशीरस संजयमामा शिंदे आणि विदर्भातील देवेंद्र भुयार यांची नावे सांगितली आहेत. म्हणजेच प्रत्यक्षात 8 पैकी केवळ तीनच नावे संजय राऊत यांनी सांगितली आहेत, म्हणजे पाच नावे गुलद्सत्यातच आहेत. त्यातही दत्तामामा आणि भुयार या दोघांनी हे आरोप फेटाळले आहेत. म्हणजे एकूण सात नावे कोणती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजपाची स्थिती काय होती?

भाजपाकडे त्यांचे स्वताचे संख्याबळ होते 106, त्यात त्यांना सात अपक्षांचा पाठिंबा होता. त्यांची नावे पुढीलप्रमाणे

भाजपच्या बाजूने 1.रवी राणा (अपक्ष) 2.रत्नाकर गुट्टे (रासप) 3.महेश बालदी (अपक्ष) 4.प्रकाश आवाडे (अपक्ष) 5.विनय कोरे (जनसुराज्य पार्टी) 6. प्रमोद पाटील (मनसे) 7. राजेंद्र राऊत (अपक्ष) त्यामुळे त्यांचे संख्याबळ 106 अधिक 07, एकूण 113 होते.

प्रत्यक्षात भाजपाला किती मते पडली ?

पहिल्या फेरीत पियुष गोयल यांना 48, अनिल बोंडे यांना 48 आणि धनंजय महाडिक यांना 27 मते मिळाली होती. ही एकूण बेरीज जाते 123, म्हणजेच त्यांच्या संख्याबळापेक्षा 10 मते त्यांना जास्त मिळाली.

बविआचा पाठिंबा भाजपाला?

यात हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचा पाठिंबा भाजपाला मिळाल्याची शक्यता गृहीत धरली तरी त्यांचे तीन आमदार 1.हितेंद्र ठाकूर (बविआ) 2. क्षितीज ठाकूर (बविआ) 3. राजेश पाटील (बविआ यांनी भाजपाला मतदान केले. तर ही आकडेवारी जाते 113 अधिक 3 म्हणजे 116 म्हणजे तरी 123 वजा 116 केले तरी सात मते जास्तीची आली कुठून हा प्रश्न आहे. त्यातही यातील एक मत पवार म्हणतात तसे प्रफुल्ल पवारांना गेले असेल तर विरोधकांची 8 मते फुटली असे प्रथमदर्शनी दिसते आहे.

आरोपीच्या पिंजऱ्यात कोण?

आपण प्राथमिक पातळीवर संजय राऊत यांची तीन नावे संजयमामा, भुयार आणि शाम शिंदे ही जरी मान्य केली, तरी उर्वरित पाच नावे कोणती हा प्रश्न उरतोय. आता यात काही नावांची चर्चा आहे. त्यात एमआयएमची दोन मते ठरल्याप्रमाणे आघाडीला न जाता भाजपाला गेली, अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच सपाचीही दोन मते मविआला गेली का, याबाबतही शंका व्यक्त होते आहे. तसेच आघाडीसोबत असेलल्या अपक्ष आमदारांपैकी काही जणांच्या नावावरही संशय व्यक्त करण्यात येतो आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.