महावितरणचा शॉक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच माहीत नाही? वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो

mahavitran bill: अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळला त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पाय उत्तर झाले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मात्र जळगावात महावितरणने पाठवलेल्या विजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे.

महावितरणचा शॉक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच माहीत नाही? वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो
महावितरणचा वीज बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो
Follow us
| Updated on: Jan 05, 2025 | 4:13 PM

mahavitran bill: महाराष्ट्रातील निमसरकारी प्रकल्प महावितरणकडून राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून राज्यभरात वीज वितरण आणि वीज बिलांचे देयके देण्याचे काम केले जाते. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जावून तीन वर्ष होत आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र घेतली. ५ डिसेंबर २०२४ पासून फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आहे. परंतु महावितरणपर्यंत त्याची माहिती नाही. महावितरणचा वीज बिलांवर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून फोटो आहे. त्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार- चव्हाण

महावितरणचा जळगाव येथील वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. याबाबत बोलताना भाजप प्रदेश प्रभारी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जे घडले ते योग्य नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. हे चुकून झाले असेल तर ठीक आहे. मात्र जर हेतुपरस्पर घडत असेल तर संबधितांवर कारवाई करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

जळगावातील बिलांवर प्रकार

अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळला त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पाय उत्तर झाले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मात्र जळगावात महावितरणने पाठवलेल्या विजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहकांना शॉक बसला आहे. यावरच आता आमदार आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

महावितरणचा कारभाराची चर्चा ग्रामीण भागांत नेहमी होत असते. तासनतास वीज पुरवठा खंडीत असतो. कधी डिपीवरील फ्यूज उडाल्यावर कोणी तो बसवण्यासाठी वायरमन मिळत नाही. आता त्याच महावितरणकडून वीज बिलावर माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटो वापरुन धक्का दिला गेला आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.