महायुतीत सारं काही आलबेल नाहीच? नाशिकच्या घडामोडी कुठपर्यंत जाणार?

नाशिकमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत भुजबळांनी दांडी मारत आमचा उमेदवार असताना आम्ही त्याचाच प्रचार करणार, असं स्पष्ट केल्याने संघर्ष निश्चित असल्याचा चित्र स्पष्ट झालं आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असं अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केल्याने वाद पेटल्याचं बघायला मिळत आहे.

महायुतीत सारं काही आलबेल नाहीच? नाशिकच्या घडामोडी कुठपर्यंत जाणार?
छगन भुजबळ आणि दादा भुसे
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 10:43 PM

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री समोरासमोर उभे ठाकले आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पिछेहाटमुळे एकीकडे महायुतीत अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील महायुतीतला बेबनाव समोर आला आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनी आपले उमेदवार दिल्याने या निमित्ताने नाशिकचे थेट आजी-माजी पालकमंत्रीच समोरासमोर उभे ठाकणार असे चित्र आहे. शिंदे गटाकडून एकीकडे किशोर दराडे उमेदवारी करत असताना अजित दादा गटाकडून महेंद्र भावसार यांना देखील चाल देण्यात आल्याने महायुतीत अस्वस्थता बघायला मिळते आहे.

महायुतीच्या बैठकीत भुजबळांची दांडी

नाशिकमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत भुजबळांनी दांडी मारत आमचा उमेदवार असताना आम्ही त्याचाच प्रचार करणार, असं स्पष्ट केल्याने संघर्ष निश्चित असल्याचा चित्र स्पष्ट झालं आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असं अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केल्याने वाद पेटल्याचं बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या उमेदवाराकडून देखील महायुती एक संघ असून वेळेवर अजित दादा गटाचा उमेदवार माघार घेईल, असा दावा केला जात आहे.

महायुतीच्या या गोंधळाचा फायदा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याकडून सध्या केला जातो आहे. आपसातील प्रश्न सोडवू शकत नाहीत ते शिक्षकांचे प्रश्न कसे सोडवणार? असा टोला गुळवे यांनी लगावला आहे. तर प्रस्थापितांना धक्का देऊन त्यांची मुजोरीच संपुष्टात आणण्याच आवाहन अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत बेबनाव असल्याच बघायला मिळत आहे. अशात आता छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्यासारखे दिग्गज नेते जर एकमेकांसमोर प्रचार करू लागले तर आगामी काळात हेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गोंधळ रोखण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते काय प्रयत्न करतात? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.