Mahim Assembly Election Results 2024 : माहीममध्ये हायव्होल्टेज लढत ! अमित ठाकरे, महेश सावंत की सदा सरवणकर, कोणी मारणार बाजी ?
Mahim Assembly constituency : माहीममध्ये मनसेतर्फे अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत महायुती मनसेच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिंदे गटाचे सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. तर दुसरीकडे मविआतर्फे शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आल्याने तेथून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे माहीममध्येही ठाकरे वि ठाकरे अशी लढत असून त्यांच्यासमोर सदा सरवणकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचे आव्हान होते. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात 20 तारखेला मतदान झाले असून आज मतमोजणी होऊन एकेका मतदारसंघाचे निकाल समोर येणार आहेत. राज्यातील अनेक हाय व्होल्टेज लढतींपैकी एक मतदारसंघ होता माहीमचा. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते कारण तेथे सामना होता ठाकरे वि. ठाकरे या भावा-भावांमधील आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचंही तिकडे तगडं आव्हान होतं. मनसेचे अमित ठाकरे वि. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत अशी बिग फाईट यंदाच्या निवडणुकीत पहायला मिळत आहे. अखेर या जागेचा निकाल आज समोर आला असून ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आहेत. ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
मुंबईतील सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र, अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची आधी ओळख होती. मात्र मनसेचा उमेदवारा, तेही राज ठाकरेंचा पुत्र येथून निवडणूक लढवत असल्याने वेगळंच चित्र दिसलं. सुरुवातीला अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. त्यानंतर ते भांडुपमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोललं जात होतं. अखेर अमित ठाकरेंसाठी माहीम विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आला. यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला, त्यामुळे सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या होत्या.
महायुतीकडून आमदार सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात
मनसेचा उमेदवार जाहीर होताच महायुतूतर्फेही उमेदावरा जाहीर झाला. खरंतर लोकसबा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला होता, त्यामुळे विधासभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराविरोधात महायुती उमेदवार नसेल अशी अटकळ होती. मात्र महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला ही जागा आली आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या जागेवरून नाट्य सुरू होते, मात्र सरवणकर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर अमित ठाकरेंसमोर सरवणककरांचे तगडे आव्हान होते.
तिरंगी लढत
तर मविआतर्फे जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला ही जागा आली. माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दादर माहीम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधी होणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले होते. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. अखेर या जागेचा निकाल समोर आला आहे.
माहिम विधानसभा निवडणूक निकाल 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting
विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE