अमित ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी?, सदा सरवणकर मीडियासमोर आले, पण… भूमिका काय?

यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मोठ्या लढती होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान आहे.

अमित ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी?, सदा सरवणकर मीडियासमोर आले, पण... भूमिका काय?
सदा सरवणकर
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 12:31 PM

विधानसभा निवडणुकांसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे, अवघ्या 16 दिवसांवर ही निवडणूक आली आहे. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे अनेक ठिकाणी बंडखोरी होत असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मोठ्या लढती होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सरवणकरांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेकांनी त्यांची मनधरणी केली, त्यांना विधानपरिषदेचीही ऑफर देण्यात आली आहे. मात्र यांतरही सरवणकर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत

आज विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अवघे काही तास उरले आहेत. त्यापूर्वी सदा सरवणकर यांनी माध्यमांसमोर येऊन पुन्हा त्यांची भूमिका स्पष्ट केली. आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सरवणकर यांनी ठामपणे सांगितलं. ही निवडणूक मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी, माझ्यासाठी लढवत नाहीये. माझ्यासोबत गेली अनेक वर्ष जे शिवसैनिक आहेत, ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत, अनेक संकटात, कठीण परिस्थितीत ते माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यांच्याशी मी बोलणार आहे. तसंच मतदारसंघातील लोकांशी बोलणार, त्यांची भावना काय आहे, ते जाणून घेऊन मगच मी माझा निर्णय घेईन, असे त्यांनी स्पष्ट केलं.

तर मी अर्ज मागे घेईन…

महायुतीच सरकार यावं यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचे आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं हेच आमचं ध्येय असून त्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मला त्याग करावा लागला तर तो करण्यास मी तयार आहे, असं म्हणत सरवणकरांनी अर्ज मागे घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

मी त्याग करायला तयार

मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, त्यांच्याशी बोलणं झालं. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घ्या असं शिंदेंनी सांगितल्याचं सरवणकर यांनी नमूद केलं. महायुतीचं सरकार यावं आणि पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी काही त्याग करावा लागला तर मी तो करण्यास तयार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी बोलून अंतिम निर्णय घेईन, असे त्यांनी स्पष्टं केलं.

राज ठाकरेंबद्दल आमच्या मनात प्रेम, आदर आहे. मी संघटनेसाठी खूप वेळा त्याग केला आहे, त्यामुळे हा त्याग करण्यासाठीदेखील मी तयार आहे. मनसे जर इतर जागांवर त्यांचे उमेदवार मागे घेण्यास तयार असेल तर मी एका जागेसाठी अडून बसणार नाही. मी माझ्या भावना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडल्या आहेत, असे सरवणकरांनी नमूद करत अर्ज मागे घेण्याचे संकेत दिलेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.