उद्धव ठाकरे यांची सभा, ऊर्दूत बॅनर, मालेगावच्या सभा अन् बॅनरची जोरदार चर्चा!
खेडच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मालेगाव : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. त्यामध्ये नुकतीच खेडची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेत आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा असणार आहे. यासाठी संजय राऊत हे दोन दिवसांपासून मालेगाव दौऱ्यावर आहे. सभेची जोरदार तयारी केली जात असून एक लाख नागरिक उपस्थित असण्याची शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यासह स्थानिक नेते जोरदार तयारी करीत आहे. त्यामध्ये मालेगावचे अद्वय हिरे यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जात असून सभेसाठी सर्वांना निमंत्रित केले जात आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना उद्धव ठाकरे उद्या मालेगाव मध्ये सभा घेत आहेत आणि मालेगाव मध्ये या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी ठाकरे गटाच्या वतीने उर्दूमध्ये बॅनर मालेगावच्या चौका चौकात लावण्यात आलेले आहेत.
सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि त्यामुळे या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी विशेष प्रयोजन केले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावले असून उर्दू भाषेतून या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
या संपूर्ण बॅनरबाजीवर संजय राऊत थेट समर्थन करत असे म्हटलेल आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? अनेक लेखक, अनेक अभ्यासक साहित्यिक त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेल आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त या सभेला यावं यासाठी ठाकरे गटाकडून हे प्रयोजन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहेत.
अर्थात हिंदुत्वाची कास धरणाऱ्या आणि एकूणच हिंदुत्वावर राजकारण करणाऱ्या ठाकरे गटाकडून उर्दू भाषेत बॅनरबाजी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून उर्दूमध्ये बॅनर लावण्यात आलेल्या बॅनरवर येणाऱ्या दिवसांमध्ये राजकीय वाद पेटणार हे मात्र निश्चित आहे.
उद्या मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक येतील असा विश्वास व्यक्त केला जात असताना मुस्लिम भागात उद्धव ठाकरे येऊन जाहीर सभा घेणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.