काल जय मराठाची घोषणा, आज शिवाजी महाराज, टिळकांची आठवण, ममतांच्या अजेंड्यावर नेमकं काय?

ममता दीदींनी मराठी बोलून परिषदेची सुरुवात केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. 'मी महाराष्ट्रातील सर्व लोकांचे आभार मानते आणि अभिनंदन करते', असे त्या म्हणाल्या. ममता म्हणाल्या, 'महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे ऐतिहासिक नाते आहे. लाल-बाल-पाल (लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र बोस) या महान स्वातंत्र्यसैनिकांची त्रिकूट असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर रवीनब्रनाथ टागोरांनी लिहिलेली प्रसिद्ध कविता असो, सर्वांनाच याची माहीती आहे.

काल जय मराठाची घोषणा, आज शिवाजी महाराज, टिळकांची आठवण, ममतांच्या अजेंड्यावर नेमकं काय?
Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 3:08 PM

मुंबईः काल शिवसेना नेते (Shiv Sena) आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, शरद पवारांना भेटण्यापूर्वी ममता यांनी आज लेखक, गीतकार,पत्रकार, न्यायाधीश इत्यादी विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि प्रसिद्ध व्यक्तींसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली जिथे त्या म्हणाल्या की तज्ञांनी राजकारणात सामील होण्याची गरज आहे, ज्याने आहला देश आणि आपली लोकशाही वाचेल. ममता दीदींसोबत स्टेजवर गीतकार जावेद अस्ख्तर राज्यावर उपस्थित होते.

‘महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे ऐतिहासिक नाते’

दरम्यान, ममता दीदींनी मराठी बोलून परिषदेची सुरुवात केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. ‘मी महाराष्ट्रातील सर्व लोकांचे आभार मानते आणि अभिनंदन करते’, असे त्या म्हणाल्या. ममता म्हणाल्या, ‘महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे ऐतिहासिक नाते आहे. लाल-बाल-पाल (लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल) या महान स्वातंत्र्यसैनिकांची त्रिकूट असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर रवीनब्रनाथ टागोरांनी लिहिलेली प्रसिद्ध कविता असो, सर्वांनाच याची माहीती आहे. यावरून आपल्या दोन्ही राज्यांचे नाते किती घट्ट आहे हे दिसून येते. महाराष्ट्र आणि बंगालचे सांस्कृतिक सणही सारखेच आहेत. त्यामुळे आपण हे नाते आणखी घट्ट केले पाहिजे’, त्या म्हणाल्या.

ममतांच्या अजेंड्यावर नेमकं काय?

काल जय मराठा जय बंगालचा नारा दिल्यानंतर आणि आज महाराष्ट्र आणि बंगालच्या इतिहासाला उजाळा देत, एक प्रकारे ममता बॅनर्जींनी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचा विचार व्यक्त केला आहे. ममतांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात काँग्रेस पक्षाच्या भेटीचा एकही उल्लेख नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध लढण्यासाठी भारतातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि ममता बॅनर्जी आघाडीवर होते. पण आता काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे, ममता बॅनर्जींनी आपले लक्ष प्रादेशिक पक्षांकडे वळवले आहे आणि देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे राजकीय तज्ञांचं म्हणण आहे.

“तृणमूल कार्यकारिणीने पक्ष मजबूत करण्यासाठी लवकरच काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. तृणमूल लवकरच राष्ट्रीय स्तरावर पक्ष बनणार आहे. पक्ष वाढत आहे. तृणमूल 2024 मध्ये संपूर्ण देशाला रस्ता दाखवेल,” असं तृणमूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी अलीकडेच म्हटले आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षानेही जोरदार प्रचार सुरू केला आहे. आता ममता बॅनर्जींनी आपला मोर्चा महाराष्ट्रात वळवला आहे. शरद पवार यांच्या आजच्या महत्त्वाच्या भेटीनंतर राज्यात काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर बातम्या

Parliament session:खासदारांच्या निलंबनावरून संसदेबाहेर जोरदार आंदोलन, जया बच्चन यांनी चॉकलेट आणि पापड वाटले

जे केजरीवालांनी केलं ते ठाकरे सरकार करणार का?; दिल्लीत पेट्रोल स्वत, व्हॅट हटवला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.