Manoj jaranage Patil | मोठी बातमी, OBC समाज मनोज जरांगे पाटील यांच्यावर 100 JCB मधून उधळणार फुलं
Manoj jaranage Patil | मनोज जरांगे पाटील यांचा OBC कडून सन्मान हा ओबीसी नेत्यांसाठी धक्का आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यापासून अन्य ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रचंड टीका करत होते. ओबीसीमधील कुठला समाज मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान करणार आहे?
जालना (संजय सरोदे) : मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा तिसऱ्या टप्प्याचा दौरा नऊ दिवसांचा असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या गाठी-भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दौऱ्यावर निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याच वैशिष्ट्य म्हणजे OBC कडून त्यांचा सत्कार होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी त्यानंतर परांडा येथे सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वाशी येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर माळी समाजाच्या वतीने 100 जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे. 1 टनाचा हार घातला जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा माळी समाजाकडून सन्मान हा ओबीसी नेत्यांसाठी धक्का आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यापासून अन्य ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आगपाखड करत होते. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील हे गावा-गावातील ओबीसी समाजाचा पाठिंबा मला आहे, फक्त ओबीसी नेते विरोध करतायत हे सांगत होते. या सत्कारामुळे मनोज जरांगे पाटील जे बोलतायत त्यावर शिक्कामोर्तब होत चाललय. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्याव अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदींचा शोध घेऊन आरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. कुणबी समाज ओबीसीमध्ये येतो. ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाला अशा प्रकारे आरक्षण देण्यास विरोध आहे. दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांनी मोर्च, सभा आयोजित केल्या आहेत.
कशावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजून दोन दिवस वाट बघू?
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी रांगोळी व बॅनर लावून नागरिक सज्ज आहेत. वाशी शहरात मंत्री आमदार नेत्यांना शहरप्रवेश बंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. “मराठा समाजाचा आशिर्वाद घेण्यासाठी निघालोय. कुणबी नोंदी सापडत असल्याने मराठा समाजात उत्साह निर्माण झालाय, मराठा आरक्षण मिळणार, लेकरा बाळांच कल्याण होणार हा विश्वास आता समाजाला वाटतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सभांमधून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत. “टाइमबॉण्ड अजून सरकारने दिलेला नाही, त्यावर अजून दोन दिवस वाट बघू” असं उत्तर त्यांनी दिलं.