Maratha Reservation: ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत पाहू नये…’, मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांचा थेट हल्ला
Maratha Reservation: नामदेव शास्त्री हे एक मोठे महंत आहेत. राजकीय लोक डागळेलेले असतात. त्यांना दोष देऊन जमणार नाही. त्यांना कोणीतरी शिकवत असतील की, असे बोला तसे ते बोलले.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण सोडले. मनोज जरांगे यांच्या आठ मागण्या होत्या. त्या पैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार मागण्यावर सकारात्मक आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाहीतर मुंबईला मोर्चा नेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. आता शुक्रवारी पुन्हा त्यांनी या विषयावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा अंत पाहू नये. आमच्या भावनांशी त्यांनी खेळू नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
काय म्हणाले मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सगे सोयरे अंमलबजावणी ही कायदेशीर आहे. हा विषय कायदेशीर नसता तर हरकती मागितल्या नसत्या. कायद्याच्या चौकटीत जे बसते ते १०० % दिले जाणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मराठा हा तीन वेळा मागास सिध्द झालेला आहे. मराठ्यांचा व्यवसाय शेती असल्याने सरसकट प्रमाणपत्र देणे कायद्याने बरोबर आहे. तसेच मराठा आंदोलकांवर राज्यात दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानुसार आता कारवाई अपेक्षित आहे.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नामदेव शास्त्री हे एक मोठे महंत आहेत. राजकीय लोक डागळेलेले असतात. त्यांना दोष देऊन जमणार नाही. त्यांना कोणीतरी शिकवत असतील की, असे बोला तसे ते बोलले. एक संस्कारी पिढी घडवणारे ते आहेत. समाज घडवणारे ते आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवले असणार, अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांना पाठिशी घालणार नाही…
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, कोणताही समाज विकृत पणाने केलेले कार्याला पाठिशी घालत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात समाजात प्रचंड उद्रेकाची लाट तयार झाली. त्यामुळे समाज धनंजय मुंडे यांना पाठिशी घालणार नाही. नामदेव शास्त्री बोलण्याच्या ओघात बोलून गेले असतील. ते आपली वाक्य दुरुस्त करतील. त्यांच्यावर दबाव असू शकतो.
न्यायची अपेक्षा न करणे फक्त गुंड सांभाळणे, स्वत:च्या जातीच्या लोकांचे खून करण्याचे पाप यांनी केले आहे. मात्र बाबाजी (नामदेव शास्त्री ) यांना पांघरून टाकायला लावल का ? नामदेव शास्त्री हे असे बोलतील यावर माझा विश्वास नाही. आरोपींनाही मारहाण झाली होती, त्यांची मानसिकता का तयार झाली हे समजून घ्यायला पाहिजे असं नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले असे म्हणणे म्हणजे आरोपींना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.