Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना….ही धमकी नाही तर’, मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेवर सभेतून हल्ला

मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग धनंजय मुंडे यांना पाहतो. धनंजय मुंडे हे त्यांचे पाप लपवण्यासाठी ओबीसीचे पांघरुन घेत आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

'जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना....ही धमकी नाही तर', मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेवर सभेतून हल्ला
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 4:09 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धारशिवमधील आक्रोश मोर्चातून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. गाठ मनोज जरांगे यांच्याशी आहे. २५ जानेवारीनंतर तुमची मस्ती उतरवणार, असे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना थेट म्हटले आहे. मनोज जरांगे जाहीर भाषणात म्हणाले, जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे. धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा. ही धमकी नाही तर सावध करत आहे. यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. तुमचे पाप झाकण्यासाठी पांघरुन घेऊ नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

२५ तारखेनंतर सोडणार नाही

मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग धनंजय मुंडे यांना पाहतो. धनंजय मुंडे हे त्यांचे पाप लपवण्यासाठी ओबीसीचे पांघरुन घेत आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

हा मकोका आम्हाला अमान्य

मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका लागला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही. खंडणीतील आरोपीवर मकोका लागला पाहिजे. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुटुंबाला शब्द दिला तो पाळा.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजास संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, शांत राहा. पण तुमच्या कुटुंबाचे, गल्लीचे गावाचे संरक्षण करावे तुम्हाला करावे लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकांना मदत करा नाहीतर मुडदे पडतील, आपल्या लेकी बाळे संपतील. किती दिवस आपण मुक्क्याप्रमाणे बसणार आहात. हे मुठभर आहेत, त्यांचा माज उतरवण्यास वेळ लागणार नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तर यापुढे सावध राहा. मी त्यांना मोजत नाही. कधी मोजणार नाही. मी मृत्यूस घाबरत नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगणार नाही. परंतु तुम्ही बेफीकर राहू नका. या लोकांना नीट करण्याचा सर्व गोष्टी मराठ्यांचा हातात आहे. ही लोक धनंजय देशमुख यांना धमकी देत आहेत आणि आम्ही गुंडांना बोलायचे नाही का? आता जशाच्या तसे उत्तर द्यावे लागणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे तुमच्या घरातील कोणी मेल्यावर आम्ही मोर्चा काढायचे काय? आमच्या संतोष देशमुख यांच्या जीव घेतला, त्यानंतर तुमचे समाधान झाले नाही. प्रतीमोर्च काढण्याचे सांगत आहात. हे लक्ष मस्तीत वागू लागत आहे. त्यांच्या मुजोरपणामुळे त्यांची पत कमी करुन घेतली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.