Maratha Andolan | मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला

Maratha Andolan | राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आरक्षणासाठी मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला. समाजासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे यांची चिकटी आणि धडपड संपूर्ण राज्याने पाहिली.

Maratha Andolan | मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला
manoj jarange patil
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 12:14 PM

मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. आंदोलनाचा 14 वर्षांचा वनवास संपला. समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाले. मराठा समाजासाठी 2011 पासून सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर 2024 मध्ये यश आले. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता. या प्रवासातील शेवटचे आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील कमालीचे भावूक झाले होते. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघताना त्यांना आपले आश्रू रोखता आले नव्हते.

कधीपासून सुरु झाले आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांनी 2011 पासून मराठा समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. आरक्षणाच्या चळवळीत ते 2011 मध्ये सक्रिय झाले. अवघ्या तीन वर्षांत ते आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करु लागले. त्यांनी 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा लक्षवेधक ठरला. त्यानंतर 2015 ते 2025 या काळात त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.

समाजाच्या आरक्षणासाठी जमीन विकली

मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील मोतोरी या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. त्यांच्या घराची परिस्थिती सामान्य होती. यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम सुरु केले. परंतु समाजासाठी काम करायचे त्यांनी ठरवले आणि कुटुंबकडे दुर्लक्ष करत मराठा आंदोलनात सहभागी झाले. मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.

हे सुद्धा वाचा

शिवबा संघटनेची स्थापना

मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. जालनामधील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सहा दिवस उपोषणही केले. मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसचे काम केले होते. परंतु राजकीय वातावरणात ते रमले नाहीत.

लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून आरक्षणासाठी उपोषण सुरु केले होते. 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागले.

शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.
'शिंदे आमदारांच्या विनंतीला नकार देणार नाहीत', काय म्हणाले शिरसाट
'शिंदे आमदारांच्या विनंतीला नकार देणार नाहीत', काय म्हणाले शिरसाट.