मराठा आंदोलनात फूट, आधी अजय महाराज, आता संगीता वानखेडेंचा जरांगेंवर घणाघात

manoj jarange patil | गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होऊ लागले आहे. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केले. त्यानंतर काही तासानंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

मराठा आंदोलनात फूट, आधी अजय महाराज, आता संगीता वानखेडेंचा जरांगेंवर घणाघात
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 1:50 PM

मुंबई, दि. 22 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात फूट पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होऊ लागले आहे. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि किर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्याच्या काही तासानंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना समोरे जावे लागत आहे.

अजय महाराज यांचा हल्ला

बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले होती की, मनोज जरांगे यांना अध्यादेश, अधिनियम यामधील फरक माहीत नाही. अधिकाऱ्यांशी ते खालच्या भाषेत बोलतात. त्यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करतात. अनेक कुटुंबाना त्यांनी उद्धवस्थ केले आहे. ते हेकेखोर आहेत. यामुळे मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. १० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी समाजाची मंजुरी घेतली नाही. आधी ठरते वेगळे आणि माध्यमांशी बोलताना ते वेगळी भूमिका घेतात, असा आरोप अजय महाराज यांनी केला.

मनोज जरांगे मागे शरद पवार- संगीता वानखेडे

मराठा आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्या संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवली. त्या म्हणाले,” मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु मला खरे समजल्यावर गेल्या १ ते १.५ महिन्यांपासून मी विरोध करत आहेत. मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवले आहे. ”

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे यांनी आरोप फेटाळले

मनोज जरांगे यांनी अजय महाराज यांचे आरोप फेटाळले आहे. सरकारकडून आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अजय महाराज यांनी पैसे घेतल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारला हा ट्रॅप महागात पडणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले.

हे ही वाचा

लग्नाचे मुहूर्त टाळा, वेळा बदला, जरांगे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, प्लॅन काय ?

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.