माणूस सागर बंगल्याची पायरी चढल्यावर परत येतच नाही, काय निंबू-मिरची… मनोज जरांगे नेमके काय बोलले
लाडकी बहीण योजनेचे पैसे फडणवीस यांनी त्यांची नागपूरमधील जमीन विकून दिले नाहीत. ते पैसे आमचेच आहे. परंतु त्या दीड दोन हजाराने आमचे काहीच भागणार नाही. दिवाळीत आनंदाचा शिधा देताय, पण डाळीत कीडे असतात, तेलही खराब असते.
विधानसभा निवडणुकीतील डावपेच आम्ही सांगणार नाही. जर आरक्षण दिले नाही तर सागर बंगल्यावर जाणार आहोत. अधिकाऱ्यांना सागर बंगल्यावाला बाबा व्हॅलीडीटी देऊ देत नाही. त्यांना नीट करण्याचे औषध फक्त मराठ्यांकडे आहे. त्या सगळ्यांना मी नीट करतो. परंतु माणूस सागर बंगल्याची पायरी चढला की परतच येत नाही. हा बाबा काय लिंबू मिरची देतो कळत नाही, असा हल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला.
त्या दीड-दोन हजारात काही होणार नाही
सगळं राज्य आमचं आहे. त्यांना फक्त भुजबळ लागतो. हा जडी बुटीवाला सागर बंगल्यावर लागतो. पण आम्ही सगळ्यांना आमचं समजतो. आम्ही माणसं आणि विभाग यात भेदभाव करत नाही. पीकविमा हाच बाबा शेतकऱ्यांना देत नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे फडणवीस यांनी त्यांची नागपूरमधील जमीन विकून दिले नाहीत. ते पैसे आमचेच आहे. परंतु त्या दीड दोन हजाराने आमचे काहीच भागणार नाही. दिवाळीत आनंदाचा शिधा देताय, पण डाळीत कीडे असतात, तेलही खराब असते. सत्तेची एवढीही मस्ती असू नये, असा टोला मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना लावला.
फडणवीस नाहक धनगरांना मराठ्यांच्या अंगावर घालत आहे. भुजबळांचे ऐकून धनगरांनी मराठ्यांच्या अंगावर जाऊ नये. भुजबळ यांचे ऐकून वाद अंगावर घेऊ नये. सत्ता यांची येईल पण आपल्या वाटेला फक्त केसेस येतील.
मराठवाड्यात उद्योग उभे करायला सरकारला रोग आला का? असा सवाल जरांगे यांनी केला. आमच्या शेतीमालाला भाव द्या. तुमच्या कर्जमुक्तीची आम्हाला गरज नाही. कामगार, गरीब, वंचित यांचे प्रश्न सोडवा. गोरगरिबांनी विधानसभेत जावे हिच माझी इच्छा आहे. गरिबांना निवडून द्या, त्यांचा धुराळाच काढतो, असे आवाहन मतदारांना जरांगे यांनी केले. मराठवाड्यात उद्योग आले नाही, त्यावरुन त्यांनी राजकारण्यांना घेरले.
राजकोट – सिंधुदुर्ग येथे उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प आज कोसळले. त्यावर मनोज जरांगे यांनी सरकारला घेरले. छत्रपती संभाजीराजे यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले पत्र देखील पोस्ट केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी तेव्हाच हा पुतळा बदलण्याची मागणी केली असल्याचे उघडकीस आले आहे. तथापी, छत्रपती संभाजीराजे यांच्या या पत्रावर पंतप्रधान कार्यालयाने निराशाजनक भूमिका घेतल्यानेच आजचा दुर्दैवी प्रसंग ओढवला.