मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली, डॉक्टरांनी दिला असा सल्ला

Manoj Jarange Patil Health Update: सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या अंगात ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे ग्लॅलेक्सि हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली, डॉक्टरांनी दिला असा सल्ला
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 11:12 AM

Manoj Jarange Patil Health Update: मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका बजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजातील तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचे सांगितले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरु आहेत. अनेक इच्छूक त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या अंगात ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे ग्लॅलेक्सि हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.

धर्मगुरुंची 31 ऑक्टोबर रोजी बैठक

मनोज जरांगे यांची प्रकृती बरी नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण न देणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीत विविध धर्माचे धर्मगुरु आहे. हेलिकॉप्टर आणि विमानाने महत्त्वाचे धर्मगुरू येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मराठा समाज बांधवांनी 31 तारखेला अंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मराठा- मुस्लिम एकत्र आणणार

मनोज जरांगे यांनी मराठा आणि मुस्लिमांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते 31 ऑक्टोबरला अधिकृत फायनल बैठक घेणार आहे. त्या बैठकीनंतर कोण उमेदवार आणि कोणता मतदार संघ यासंदर्भातील अंतिम निर्णय देणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे म्हणाले, पुन्हा पुन्हा सांगतो मराठा मुस्लिम झाल्याशिवाय मज्जा नाही. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही.

हे सुद्धा वाचा

विधानसभेत दलित, मुस्लिम, मराठा एकत्र आले तर सगळे आमचे निवडून येणार आहेत. कधी चेहरा न बघितलेले शेतकऱ्याचे मुले आमदार असतील. मुसलमान समाजातील मुले तुम्हाला आमदार अन् मंत्री झालेले दिसतील. पण हे सुंदर स्वप्न बघण्यासाठी समीकरण जुळले पाहिजे, दलित, मुस्लिम, मराठयांनी शहाणे होणे गरजेचं आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला....
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला.....
विरोधकांना मला पाडायचं होतं तर..., रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक
विरोधकांना मला पाडायचं होतं तर..., रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक.
'माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम...', दादांचे आर. आर. पाटलांवर आरोप
'माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम...', दादांचे आर. आर. पाटलांवर आरोप.
बिचुकले पुन्हा रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढल
बिचुकले पुन्हा रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढल.
पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?
पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?.
ठाकरेंची माफी, माझी चूक.., नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांची प्रतिक्रिया
ठाकरेंची माफी, माझी चूक.., नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांची प्रतिक्रिया.
'वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी चिंतेत
'वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी चिंतेत.
'शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर..', राऊतांचा मोठा दावा काय
'शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर..', राऊतांचा मोठा दावा काय.