Manoj Jarange Patil : मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, डॉक्टर काय म्हणाले? VIDEO

Manoj Jarange Patil : संगे सोयरे कायद्याची सरकारने अमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय.

Manoj Jarange Patil : मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, डॉक्टर काय म्हणाले? VIDEO
Manoj Jarange Patil
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 1:05 PM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट आहे. संगे सोयरे कायद्याची सरकारने अमलबजावणी करावी या मागणीसाठी ते आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज खालावली आहे. आज आरोग्य पथकाने जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत जरांगे पाटील यांचा बीपी कमी झाल्याच समोर आलंय. या सोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिलीय.

आज त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी केली त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, अन्यथा त्यांची प्रकृती आणखीन खालावेल असं डॉक्टर जयश्री भुसारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिली आहे. ‘मराठा जाती विरोधात बोलू नका’

काल जालन्यातून निवडून आलेले खासदार अमर काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसचे अमर काळे यांनी भाजपाचे दिग्गज उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव केला आहे. अमर काळे भेटीसाठी आलेले त्यावेळी जरांगे पाटील यांनी काँग्रेसला इशारा दिला. “मराठा आरक्षण आणि मराठा जाती विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारला पाडेन आणि काँग्रेसच्या सर्व सीट पाडेन” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.