Manoj jarange patil | पुण्यात ‘या’ तारखेला होणार मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा

Manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. सध्या पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची तयारी सुरु आहे.

Manoj jarange patil |  पुण्यात 'या' तारखेला होणार मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 8:56 AM

पुणे (विनय जगताप) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील, रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. भोर मधील शेटे मैदानावर संध्याकाळी 4 वाजता जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी रायगड किल्ल्याचं दर्शन घेऊन जरांगे पाटील, वरंधघाट मार्गे भोरला येणार आहेत. भोरमध्ये 4 वाजता सभा घेऊन जरांगे पुण्यातील आळंदी येथे मुक्कामी जाणार आहेत. भोर तालुक्यात मनोज जरांगे यांच्या सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांच्या बैठका, जास्तीतं जास्त लोकांनी सभेला यावं, यासाठी मराठा समाजाला आवाहन करण्यात आलय.

जरांगे यांच्या स्वागताची सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा मराठा समाज गाठी भेटी दौरा 15 नोव्हेंबर पासून सुरु होतोय. 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जरांगे पाटील, रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. भोरमध्ये संध्याकाळी 4 वाजता सभा घेऊन जरांगे पुढे पुण्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे मुक्कामी असतील. भोर तालुक्यात मनोज जरांगे यांच्या सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांकडून गावागावामध्ये बैठका घेण्यातं येतायत, जास्तीतं जास्त मराठा बांधवांनी सभेला यावं, असं आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आलयं.

सरकारकडून वेगवान हालचाली

जरांगे यांच्या स्वागताची सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्याव, ही त्यांची मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारने पावल उचलली आहेत. राज्यात सर्वत्र अभ्यासकाकडून शोध मोहिम सुरु आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण द्याव ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. दरम्यान कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे.

नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.