मनोज जरांगे पाटील यांनी आता जातीय समीकरण केलं फिट, M फॅक्टर काय?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठी, मुस्लीम आणि दलित समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे. की ७५ वर्षानंतर ही संधी आली आहे. त्यामुळे ही संधी वाया जाऊ देऊ नका.

मनोज जरांगे पाटील यांनी आता जातीय समीकरण केलं फिट, M फॅक्टर काय?
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 10:01 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आता जातीय समीकरण फिट केलंय. मराठा, मुस्लीम आणि दलित या समीकरणातून आता सत्ताधाऱ्यांना पाडून जिंकणार, असं जरांगेंनी म्हटलंय. अंतरवाली सराटीत मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत जरांगेंची बैठक झाली आणि या बैठकीत मराठा, मुस्लीम आणि दलित असं समीकरण सेट करण्यात आलं. एक एका मतदारसंघात 4-5 अर्ज भरण्याचं आवाहन आधीच जरांगेंनी केलं होतं. आता कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचे अर्ज काढायचे हे मराठा, मुस्लीम आणि दलित समीकरणावरुन ठरवलं जाणार असून 3 तारखेला घोषणा होणार आहे.

जरांगेंचा अधिक जोर हा मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यात 48 विधानसभेच्या जागा आहेत. स्वाभाविक आहे, जरांगेंच्या निशाण्यावर भाजपचेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात असतील. तसा डाव राखून ठेवल्याचंही जरांगे सांगत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा असला तरी, एकट्या मराठ्यांच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना पराभूत करता येत नाही, हे जरांगेंना चांगलं माहिती होतं. आणि जरांगे फक्त मराठाच नाही तर मुस्लीम आरक्षणाचीही मागणी करत आहेत. त्यातूनच मराठा, मुस्लीम आणि दलित कॉम्बिनेशन जरांगेंनी तयार केलंय. अर्थात या M आणि D फॅक्टरचा परिणाम 23 नोव्हेंबरला दिसेल.

दलित, मुस्लीम आणि मराठा एकत्र आलाय, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आल्याणे आता कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही. तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचे आणि माघारी यायचं. ७५ वर्षानंतर ही संधी मिळालीये ती वाया जाऊन द्यायची नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका जातीवर कोणीही जिंकत नाही, मराठा असो वा कुणीही. राजकारण सोपे नाही. राजकीय प्रवासासाठी  सगळ्या जातीधर्मांशिवाय पर्याय नाही. फूट पाडायचा प्रयत्न होता, शेवटच्या टप्प्यात आम्ही एकत्र आलो. आरक्षण देत नाही. मराठा नको, केवळ मराठा मतदानापुरता हवाय. कारखाने, शाळा सगळे या लोकांचे आहेत. नेता नको, पक्ष नको, आम्ही कुणाला मोठे करणार नाही. असं ही जरांगे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.