‘सावध व्हा, आपल्याला टार्गेट केले जातय… यंदा…’, मनोज जरांगे यांनी थेट दिला इशारा

Manoj Jarange Patil Dasara Melava: मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी नाही पाहू शकत. कोणतीही जहांगिरदाराची औलाद येऊ दे झुकायचे नाही. कुणालाही पाय लावायचे नाही. कुणावर अन्याय करायचे नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्व संरक्षण करायला शिका.

'सावध व्हा, आपल्याला टार्गेट केले जातय... यंदा...', मनोज जरांगे यांनी थेट दिला इशारा
Manoj Jarange patil
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 1:47 PM

Manoj Jarange Patil Dasara Melava: आपल्याला नाकारून टार्गेट केलं जातंय. सावध व्हा. आता त्यांचे डोळे उघडले असतील. नारायण गडावर असल्यामुळे मला काही मर्यादा पाळायाच्या आहेत. आता जर न्याय नाही मिळाला तर तुमच्या लेकरासाठी तुमच्या समुदायासाठी आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. त्याशिवाय पर्यायच नाही. आपल्या नाकावर टिच्चून जर कुठले निर्णय होत असतील या राज्यातील समाजावर अन्याय होणार असेल तर लेकरांची आणि राज्यातील समाजाची शान वाढवण्यासाठी गाडावच लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी घेतलेल्या दसऱ्या मेळाव्यात सांगितले. नारायण गडावर त्यांनी हा दसरा मेळावा घेतला.

तुमच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही

मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी नाही पाहू शकत. कोणतीही जहांगिरदाराची औलाद येऊ दे झुकायचे नाही. कुणालाही पाय लावायचे नाही. कुणावर अन्याय करायचे नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्व संरक्षण करायला शिका. तुम्हाल स्वसंरक्षण करावंच लागणार आहे. मी विचारलं आमचा नेमका दोष काय. कुणालाच सांगता येत नाही आमचा दोष काय.

राज्यातील समाज वाचवा…

मायबापहो लेकरं वाचवा रे, या राज्यातील समाज वाचवा. लक्षात असू द्या मायबाप हो, सोन्यासारखे लेकरं वाचवा, समाज वाचवा. माझ्या समाजातील लोकांना खाली मान घालावं लागेल असं वागू नका. स्वत:च्या लेकराची मान उंचवेल असंच आपलं पाऊल असलं पाहिजे. कोणी कुणाचं नाही. तुमचे हाल होत आहेत. तुम्हाला वेदना होत आहेत. तुमचे लेकरं अधिकारी बनलेले बघायचे आहेत. त्यांची इच्छा आहे, आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, पण आपली इच्छा आहे ते घातल्यासिवाय मागे हटायचे नाही. आपल्याविरोधात षडयंत्र केलं जातंय. आपल्याला डावललं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मला एक वचन द्या…

मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणरा नाही हा गडावरून शब्द देतो.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.