मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू, वकिलांची बैठक घेणार; मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाने खळबळ

राज्य सरकारने सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळविले आहे. परंतू या अध्यादेशामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याने या अध्यादेशाला कोर्टात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. तर सगेसोयरे अध्यादेशाशी काही दगाफटाका झाला तर मंडळ आयोगाला थेट चॅलेंज करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू, वकिलांची बैठक घेणार; मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाने खळबळ
manoj jarange patil Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 2:35 PM

मावळ | 31 जानेवारी 2024 : मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या वेशीपर्यंत लाखो मराठ्यांना आणल्यानंतर सरकारने माघार घेतली. राज्य सरकारने सगेसोयऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणी दूर करणारा अध्यादेश काढला. परंतू या अध्यादेशावर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अध्यादेशावर हरकती उपस्थित करीत त्याला आव्हान देणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाबद्दल काही दगाफटका झाला तर मंडल आयोगालाच चॅलेंज कणार असून आपण वकीलांची लवकरच बैठक घेणार असल्याचे म्हटल्याने आता ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण तापले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा पुन्हा ऐकरी उल्लेख करीत त्याला माणस मोजायला पुलावर उभे रहायला मी सांगितले होते, पण तो थांबला नाही. त्यामुळे त्याला कोटी मराठे कसे दिसतील ? मराठ्यांची 64 किलोमीटर रांग होती आणि एकूण 27 टप्पे होते असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन काहीही काळजी न करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठ्यांना केले आहे.

तर पुन्हा उपोषणाला बसु

आरक्षणाचा कायदा मोठा आहे. हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. ‘सरसकट’ या शब्दाला काहीही होणार नाही. कितीही जण एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच हे प्रकरण कोर्टात गेलं तर काही होणार नाही. यात सरकारने 22 दिवस आणि आमच्या तज्ज्ञांनी कष्ट घेतले आहे. तरीही आम्ही सावध आहोत अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आपण उपोषणाला बसणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

…तर शंभर टक्के मंडल आयोगाला चॅलेंज

माझं सर्वसामान्य ओबीसी बांधवांना सांगणं आहे की, त्याला (छगन भुजबळ) सांगा की कोर्टात आव्हान देऊन गोरगरीब ओबीसीचे नुकसान करू नको असे जरांगे पाटील भुजबळांना इशारा देताना म्हटले आहे. मंडल आयोग कोर्टाने स्वीकारलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळने जर पुन्हा काड्या केल्या तर मी शंभर टक्के मंडल आयोग चॅलेंज करेन. मंडल आयोगाला चॅलेंज करण्याबाबत लवकरच मी वकिलांची बैठक घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने आमची कुठेही फसवणूक केलेली नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या पाठीमागे उभे राहतील असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.