Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको, २४ पासून असे असणार आंदोलन

Manoj Jarange Patil | सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करावी. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. आता गावागावात २४ पासून रास्ता रोको आंदोलन करायचे आहे.

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको, २४ पासून असे असणार आंदोलन
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 2:49 PM

संजय सरोदे, बीड, दि. 21 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. कुणबी आणि मराठा एकच आहे, असा अध्यादेश काढा, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे गावे घ्या, अशा मागण्या त्यांनी पुन्हा केल्या. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करावी. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. हे आंदोलन रोज असणार आहे.

आंदोलन रोज असणार

आपण आपली गावे सांभाळयाची आहे. कोणी तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. गावागावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे. आता बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत. त्यांची काळजी घ्यायची आहे. आंदोलन २४ फेब्रवारीपासून रोज  सकाळी १०.३० वाजता सुरु करा. दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन सुरु ठेवा. ज्याला ही वेळ जमणार नाही, त्यांनी दुपारी ४ ते सात वाजता आंदोलन करायचे आहे. मराठ्यांचे हे आंदोलन शेवटचे असणार आहे. संपूर्ण देश हे आंदोलन बघणार आहे. आंदोलना दरम्यान शांतता ठेवायची आहे. कोणाची गाडी फोडायची नाही, काही जाळपोळ करायची नाही. आंदोलन संपल्यावर आपल्या शेतावर जाऊन काम सुरु करायचे आहे. रोज रास्ता रोको करुन सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, यासाठी निवेदन द्यायचे आहे. अधिकारी आल्याशिवाय निवेदन इतर कोणाला देऊ नका. सोशल मीडियावर अधिकाऱ्यांना निवेदन देतानाचे फोटो टाका.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

  • बारावीची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये, ही काळजी घ्या. विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. गरज पडली तर तुमच्या गाड्यांवर विद्यार्थ्यांना पेपरच्या स्थळी सोडून या.
  • राजकीय नेत्यांच्या दारात जाऊ नये. त्याला आपल्या दारासमोर येऊ द्यायचे नाही. आता आमदार, खासदारांना किंमत देऊ नये. हे लोक तुमच्यामुळे मोठी झाली आहेत. तुमच्या जीवावर ते दादागिरी करतात. आपल्या गावात, आपल्या दारात कोणी येऊ नये.
  • निवडणूक आयोगाला विनंती आहे, जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका.  निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या आपल्या गोठ्यावर नेऊन सोडा. गाड्या फोड्याच्या नाहीत.
  • २४ ते २९ पर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसवायचे आहे. आंदोलना दरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे. आपल्या राज्यात 25 ते 30 लाख म्हतारे असतील. माझ्या आई-बाबसह सर्व म्हातारे उपोषण करतील.
  • कुणी नेत्याने त्रास दिला तर त्याला जशास तसे उत्तर द्यायचे. तुम्ही आमच्या मुलाला त्रास दिला तर तुमच्या पुत्राला आणि पुतण्याला त्रास होईल.
  • 29 तारखेला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकच रस्ता रोको करायचा आहे. हे सर्वात मोठे आंदोलन असणार आहे.

हे ही वाचा

हे सुद्धा वाचा

ओबीसीतून आरक्षणासाठी मराठ्यांचा आता शेवटचा लढा, मनोज जरांगे आक्रमक

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.