‘खेळ उलटा झाला’; मनोज जरांगेंचे बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी अतंरवालीतून मराठ्यांना नवे आदेश, इच्छूकांची धाकधूक वाढली
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र अजूनही आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जिथे निवडून येऊ शकतो तिथे उमेदवार द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी याच बैठीकीमध्ये सगळ्यांनी अर्ज भरा असं म्हटलं होतं. मात्र आता त्यामध्ये त्यांनी बदल केला आहे. ‘आम्ही काल बोलताना म्हटलो की सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, पण सगळ्यांनी भरू नका दोन ते तीन जणांची निवड करा आणि अर्ज भरा’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
‘आम्ही काल बोलताना म्हटलो की सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, पण सगळ्यांनी भरू नका दोन ते तीन जणांची निवडा करा आणि त्यांनीच अर्ज भरा. ज्या दिवशी एक नाव डिक्लेअर होईल त्यावेळेस बाकीच्यांनी अर्ज काढू घ्या, फक्त एक अर्ज ठेवा. असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की एसटी, एससी उमेदवार आपण देणार आहोत. त्यांच्याकडून बॉण्ड घ्यायचा. पण त्याचा उलटा खेळ झाला. बॉण्ड म्हटलं की कोणीही बॉण्ड देत आहे. आम्हाला काय तुम्हाला खर्चात पाडायचे नाही, आम्ही तुमच्या मागण्याशी सहमत आहोत हे आधी आम्हाला विचारा आणि नंतर बॉण्ड द्या. मी व्यासपीठाच्या खाली आलो की तातडीने एका जणाने बॉण्ड दिला, पण तुमच मिरीट देखील बघावं लागणार आहे. एका मतदारसंघातून पन्नास – शंभर बॉण्ड आले तर उगाच खर्च. त्यामुळे बॉण्ड देण्यापूर्वी आम्हाला एकदा विचारा, जिथे आम्ही लढणार नाही तिथाला हा विषय आहे. अंतरवालीकडे चार दिवस कोणीही येऊ नका, 35 दिवस मला मोकळ सोडा असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.