Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : आता L&T च्या या गार्डची ‘मराठी गया तेल लगाने’ म्हणण्याची हिम्मत होणार नाही, हा VIDEO बघा

MNS : तो त्याला मराठीत बोलायला सांगत होता. त्या गार्डने "क्यू मराठी आता नही, में क्यू बोलू. मराठी नही आता मेरे को, जरुरी थोडी हैं, मराठी गया तेल लगाने" असा माज त्या सिक्युरिटी गार्डने दाखवला.

MNS : आता L&T च्या या गार्डची 'मराठी गया तेल लगाने' म्हणण्याची हिम्मत होणार नाही, हा VIDEO बघा
Mns Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2025 | 11:27 AM

नोकरी, रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने दररोज हजारो लोक मुंबईत येत असतात. चांगला पैसा कमावून सुखी आयुष्य जगण्याचा त्यांचा उद्देश असतो. देशाच्या विविध प्रांतातून वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक इथे येतात. मराठी ही मुंबईची, महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मुंबईत उदरनिर्वाह, व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा आलीच पाहिजे. बाहेरुन आल्यानंतर काहीजण चटकन मराठी भाषा बोलायला शिकतात. काहींना ते जमत नाही. जमत नसलं, तरी त्यांनी मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मराठी भाषा समजून घेतली पाहिजे, तर त्यांची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जुळू शकते.

पण काही लोक अपवाद असतात. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करणं, ती समजून घेणं, तर दूर राहिलं, उलट ते आपलाच माज, मिजासखोरी, अरेरावी दाखवतात. अलीकडे मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोबिंवली, दक्षिण मुंबईत असे प्रकार दिसून आले आहेत. आता पवईतही एक असाच प्रकार घडला. पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल असाच अनादर दाखवला. त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जे केलं, त्यामुळे त्याला आता मराठी भाषा नेहमी लक्षात राहीलं. मनसे स्टाइलने समजावलं

पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा एका मराठी माणसासोबत वाद झाला. तो त्याला मराठीत बोलायला सांगत होता. त्या गार्डने “क्यू मराठी आता नही, में क्यू बोलू. मराठी नही आता मेरे को, जरुरी थोडी हैं, मराठी गया तेल लगाने” असा माज त्या सिक्युरिटी गार्डने दाखवला. त्यानंतर महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचले व त्याल मनसे स्टाइलने समजावलं. महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगलाच धडा शिकवत कानाखाली लगावली.

बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालायचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालायचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.