सूर्य आग ओकतोय! चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तुमच्या शहरात काय स्थिती?
राज्यातील सर्वच भागात सूर्य आग ओकतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, राज्यात आज तापमानाची नोंद पाहिली तर चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय.
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. तर दुसरीकडे राज्यातील सर्वच भागात सूर्य आग ओकतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, राज्यात आज तापमानाची नोंद पाहिली तर चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मे मध्ये काय स्थिती असेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (Many cities in Maharashtra recorded temperatures above 40 degrees Celsius)
राज्यात कोणत्या शहरात सर्वाधिक तापमान?
>> मुंबई – 35.3 अंश सेल्सिअस >> ठाणे – 37 अंश सेल्सिअस >> रत्नागिरी – 33.8 अंश सेल्सिअस >> परभणी – 40.1 अंश सेल्सिअस >> औरंगाबाद – 38.6 अंश सेल्सिअस >> जालना – 38.2 अंश सेल्सिअस >> नांदेड – 38 अंश सेल्सिअस >> पुणे 38.3 अंश सेल्सिअस >> कोल्हापूर – 38.8 अंश सेल्सिअस >> नाशिक – 39.1 अंश सेल्सिअस >> मालेगाव – 41.8 अंश सेल्सिअस >> सांगली – 39.3 अंश सेल्सिअस >> उस्मानाबाद – 39.2 अंश सेल्सिअस >> जळगाव – 41.4 अंश सेल्सिअस >> सोलापूर – 40.3 अंश सेल्सिअस >> सातारा – 38.5 अंश सेल्सिअस >> अकोला – 41.5 अंश सेल्सिअस >> ब्रह्मपुरी – 41.8 अंश सेल्सिअस >> यवतमाळ – 41.2 अंश सेल्सिअस >> वर्धा – 40.6 अंश सेल्सिअस >>नागपूर – 40.2 अंश सेल्सिअस
28Mar, Max Temp in state: Mumbai 35.3 Thane 37 Rtn 33.8 P’bhani 40.1 A’bad 38.6 Jalna 38.2 Nanded 38 Pune 38.3 Klp 38.8 Nashik 39.1 Malegao 41.8 Sangli 39.3 Osbad 39.2 Jalgao 41.4 Slp 40.3 Satara 38.5 Akola 41.5 Chandrpur 42.8, Bramhpuri 41.8 Yawatmal 41.2 Wardha 40.6 Ngp 40.2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 28, 2021
उष्माघातापासून वाचण्यासाठी काय कराल?
सध्याची परिस्थिती पाहता उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं, उष्माघाताची लक्षणं काय आणि उष्माघातावर काय उपचार करावा हे माहीत असणे गरजेचं आहे.
उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?
- चक्कर येणे
- डोकं दुखणे
- सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे
- गरम होत असूनही घाम न येणे
- त्वचा लालसर होणे
- त्वचा कोरडी पडणे
- अशक्तपणा जाणवणे
- मळमळ होणे, उलट्या होणे
- जोरात श्वास घेणे
- हृदयाचे ठोके वाढणे
जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावी.
उष्माघातावर काय उपचार कराल?
- एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास होत असल्यास त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करा
- रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत थंड जागेत ठेवा
- रुग्णाला झोपवून त्याचे पाय थोड्या उंचीपर्यंत वर करा
- रुग्ण हा बेशुद्ध झाला असेल तर त्याला तात्काळ जवळच्या कुठल्याही क्लिनिकमध्ये आयव्ही लावण्याची व्यवस्था करा
- रुग्णाला पाणी द्या, तो शुद्धीत असेल तर त्याला ग्लूकोजयुक्त ड्रिंक्स द्या
- थंड पाणी, स्प्रे किंवा आईस पॅकने त्याचं शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?
- भरपूर प्रमाणात पाणी प्या, दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवं, ते शरीरासाठी आवश्यक आहे
- अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहील
- हलका पण पौष्टिक आहार घ्या, आहारात काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा
- सुती कपड्यांचा वापर करा
- बराच वेळ उन्हात राहावं लागत असेल तर त्वचेवर पाणी शिंपडत राहा, तसेच थोड्या थोड्या वेळानी पाणी प्या
- दुपारचं बाहेर पडणं टाळा, विशेषकरुन सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर उन्हात पडू नका
- उन्हात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा
- अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते
- अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा
संबंधित बातमी :
Summer Foods : उन्हाळ्यात डायटमध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा, मिळवा भरपूर फायदे
Many cities in Maharashtra recorded temperatures above 40 degrees Celsius