कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

यापूर्वी 21 सप्टेंबर 1995 ला देशभरातील गणपती दूध पीत असल्याचा खोटेपणा दिवसभर चालला होता असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्ह्याचे सचिव हरीश केदार यांनी म्हटलं आहे.

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण
भाविक नंदीला पाणी पाजत आहे Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:37 AM

मुंबई – महाराष्ट्रातल्या (maharashtra)अनेक जिल्ह्यांमध्ये काल नंदी आणि गणपती दूध पीत असल्याचे अनेक व्हिडीओ (video)व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. ही बातमी भाविकांना समजताचं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन खरंच दूध पीत आहे का याची पाहणी केली. तर अनेक भक्तांनी दूध आणि पाणी पाजले असल्याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भक्तांनी मंदीरात गर्दी देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. नंदी दूध पीत असल्याचे दावे अनेक जिल्ह्यात करण्यात येत असले तरी टिव्ही 9 मराठी (tv9 marathi) याची पुष्टी करत नाही. महाराष्ट्रातल्या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पालघर आणि बोईसर इत्यादी ठिकाणी भक्तांनी मंदीरात रांग लावली असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवलेले हे व्हिडीओ एक अफवा असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आलाय.

अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा भाविकांची गर्दी

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निपाणी निमगावमध्ये इतर जिल्ह्यात नंदी दूध पीत असल्याने तिथल्या ग्रामस्थांनी बापुराव गायकवाड यांच्या शेतात एक बेलेश्र्वर मंदीर आहे. तिथं जाऊन तिथल्या नंदीला पाणी पाजले ते पीत असल्याने तिथं देखील गर्दी झाली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मनिषा दत्ता गायकवाड यांनी सांगितले की, इतरत्र नंदी पाणी पित असल्याने आमच्या घराशेजारी असलेल्या नंदीला लोकांनी रात्री बारा वाजल्यापासून पाणी पाजायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिथं भाविकांची मोठी गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. तसेच तिथं अनेकजण व्हिडीओ सुध्दा काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिक, जळगाव अमरावती, पालघर, बोईसरमध्ये सुध्दा भाविकांची गर्दी

राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावातील महादेवाच्या मंदिरातील नंदी बैल दूध आणि पाणी पीत असल्याचा दावा ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे. नंदीबैल दुध आणि पाणी पीत असल्याचे तसे अनेक व्हिडीओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही आपली भूमिका मांडली आहे. अनेकांना 27 वर्षापुर्वी गणपती दूध पीत असल्याच्या अफवेची आठवण झाली आहे. हा दैवी चमत्कार नसून, यामागे वैज्ञानिक कारण असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आला आहे.

चमत्कार सिद्ध करा २५ लाख मिळवा

वारंवार अशा अफवांचे प्रकार घडत आहे. जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहे. सीबीआयने या प्रकाराची चौकशी करावी असा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान हा चमत्कार सिद्ध करून लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये मिळवा हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षापासून देत आहे. ज्यांना वाटतं नंदीची मूर्ती पाणी दुध पीत आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारावं व्हिडिओ व्हायरल करून समाजाची दिशाभूल करू नये जादू विरोधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.

काय म्हणते अंधश्रद्धा निर्मूलन समिती ?

यापूर्वी 21 सप्टेंबर 1995 ला देशभरातील गणपती दूध पीत असल्याचा खोटेपणा दिवसभर चालला होता असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्ह्याचे सचिव हरीश केदार यांनी म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे केशाआकर्षणाच्या नियमातून घडत असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली आहे. परत 27 वर्षांनी ही खोटी बाब पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. देव आणि धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनांना हात घालून अंधश्रद्धा पसरविण्याचा हा प्रकार असल्याचेही हरीश केदार यांनी म्हटले आहे

युद्धाच्या काळात हे चित्र आशादायी; IND-PAK महिला क्रिकेटपटूंच्या त्या VIDEO चं मोहम्मद कैफकडून कौतुक

7 march 2022 Panchang | 7 मार्च 2022, सोमवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.